प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 PM2021-04-22T16:27:05+5:302021-04-22T16:27:34+5:30

 लाखनी  येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गोविंदराव पोहरकर(५९) यांचे आज दि. २२ एप्रिलला पहाटे ४ वाजता नागपूर येथील खासगी रुग्णालयात आजाराने निधन झाले.

Principal Dr. Sanjay Poharkar passes away | प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांचे निधन

प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांचे निधन

Next

भंडारा: जिल्ह्यातील लाखनी  येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गोविंदराव पोहरकर(५९) यांचे आज दि. २२ एप्रिलला पहाटे ४ वाजता नागपूर येथील खासगी रुग्णालयात आजाराने निधन झाले.

मराठी विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. पोहरकरांनी  पूर्णवेळ प्राचार्यपद २००५ पासुन भूषविले.  मराठीचे तज्ञ अभ्यासक , साहित्यिक, कवी,प्रखर वक्ते म्हणून डॉ. पोहरकरांचा  नावलौकिक होता. डॉ. पोहरकरांनी 'कवी सावरकर - व्यक्तित्व व कवित्व ' या विषयावर आचार्य पदवी संपादन केली होते. त्यांच्या मार्गदर्शनात ५ विद्यार्थ्यांनी पीएचडी प्राप्त केली. डॉ. पोहरकरांनी सावरकर काव्यमिमांसा,मुलांसाठी सावरकर, संवाद कौशल्य, आता पेटवू सारे रान, ही खेरित्रात्मक व वैचारिक पुस्तके लिहिलीत व  देव आंघोळीला गेले,कलियुगातील धूवतारा, धरनीकंप, गुंजारव, सूर्यतीर्थ अशी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाली आहेत.

मागील २५ वर्षोत ५०० पेक्षाही अधिक व्याख्यानात सहभाग घेतला.वीर सावरकरांचे गाठे अभ्यासक म्हणून डॉ. पोहरकरांची ओळख होती.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली होती. २०१२ ला  स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
 सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. पोहरकरांना मिळाले होते.

Web Title: Principal Dr. Sanjay Poharkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू