प्रफुल्ल पटेल यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक; पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 10:57 IST2019-09-30T10:57:31+5:302019-09-30T10:57:56+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रकने धडक दिल्याने एक पोलिस शिपाई जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

Praful Patel's convoy hit by truck ; Police wounded | प्रफुल्ल पटेल यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक; पोलीस जखमी

प्रफुल्ल पटेल यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक; पोलीस जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रकने धडक दिल्याने एक पोलिस शिपाई जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
भंडारा येथून नागपूरकडे येत असताना भंडारा जिल्ह्याच्या हद्दीतच त्यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला एका ट्रकने धडक दिली. यात वाहनातील पोलिस शिपाई किरकोळ जखमी झाले. प्रफुल्ल पटेल यांच्या वाहनाला कुठलाही धक्का लागलेला नाही. या अपघातानंतर प्रफुल्ल पटेल यांनी या शिपायाच्या उपचारासाठी योग्य ती कारवाई पूर्ण करून नंतर ते नागपूरकडे रवाना झाले व पुढे दिल्लीला त्यांनी उड्डाण केले.
 

Web Title: Praful Patel's convoy hit by truck ; Police wounded