शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ९६ कामगारांना मिळाला स्थगनादेश

By admin | Updated: February 9, 2016 00:40 IST

तुमसर जवळील युनिडेरीडेन्ट लिमिटेड मानेकनगर येथील कंपनी व्यवस्थापनाने ९६ कंत्राटी कामगारांना बडतर्फे केले होते.

जिल्हा औद्योगिक न्यायालयाचा निर्णय : युनिडेरीटेन्ड व्यवस्थापनाला चपराक तुमसर : तुमसर जवळील युनिडेरीडेन्ट लिमिटेड मानेकनगर येथील कंपनी व्यवस्थापनाने ९६ कंत्राटी कामगारांना बडतर्फे केले होते. त्या कामगारांना भंडारा औद्योगिक न्यायालयाने पूर्ववत कामावर ठेवण्याचे आदेश दिले. हा महत्वपूर्ण निकाल शनिवारी दिला.युनिडेरीडेन्ट, मानेकनगर तुमसर येथे १० ते १५ वर्षांपासून ९६ रोजंदारी कमागार अल्पशा वेतनावर कार्यरत आहेत. कामगारांनी न्याय हक्काकरिता येथे कामगार संघटना तयार केली. त्यामूळे कपंनी व्यवस्थापनाने या कामगारांना बडतर्फे केले. यासंदर्भात कामगार संघटनेने सहायक कामगार आयुक्त, भंडारा यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. सहायक कामगार आयुक्तांच्या मध्यस्थिनंतर कामगार कामावर पूर्ववत रुजू झाले होते. कपंनी व्यवस्थापनाने षडयंत्र करुन कधी कामावर घेणे, कधी बंद करणे असा क्रम सुरु केला.सर्व कामगार येथे मुख्य उत्पादनात सहभागी आहेत. दिवस व रात्र पाळीत त्यांनी कामे केलीत कारखान्याला नफा कमवून दिला. कामगारांना कंपनीत नियमानुसार २४० दिवस पूर्ण झाले ओहत. हे कामगार स्थायी कामगाराच्या परिभाषेत मोडतात, पंरतु कपंनी प्रशासनाने वेतन, पी.एफ. व इतर मुलभूत हक्क त्यांना आजपर्यंत मिळाले नाही. स्थायी कामगारांची वागणूक त्यांना मिळाली नाही. याविरोधात न्यायशीर मार्गाने कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालय, भंडारा येथे प्रकरण दाखल केले. जिल्हा औद्योगिक न्यायालयाने सदर प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तोपर्यंत सर्व ९६ कामगारांना कंपनी प्रशासन कामावरुन बंद करणार नाही असा निकाल दिला. वर्षानुवर्षापासून मुलभूत हक्कापासून कामगाराला कंपनी प्रशासन वंचित ठेवत आहे व शासनाची दिशाभूल करीत आहे. न्यायाधीश एस. एम. शेख यांनी कपंनी प्रशासनाचा अर्ज फेटाळून लावला व कामगारांना स्थगनादेश दिला. कपंनी प्रशासनातर्फे अ‍ॅड. हितेश वर्मा यांनी बाजू मांडली तर कामगार संघटनेतर्फे अ‍ॅड. सचिन राघोर्ते, अ‍ॅड. भोयर, अ‍ॅड. रवि वाढई यांनी युक्तीवाद केला. (तालुका प्रतिनिधी)