‘त्या’ ९६ कामगारांना मिळाला स्थगनादेश
By Admin | Updated: February 9, 2016 00:40 IST2016-02-09T00:40:26+5:302016-02-09T00:40:26+5:30
तुमसर जवळील युनिडेरीडेन्ट लिमिटेड मानेकनगर येथील कंपनी व्यवस्थापनाने ९६ कंत्राटी कामगारांना बडतर्फे केले होते.

‘त्या’ ९६ कामगारांना मिळाला स्थगनादेश
जिल्हा औद्योगिक न्यायालयाचा निर्णय : युनिडेरीटेन्ड व्यवस्थापनाला चपराक
तुमसर : तुमसर जवळील युनिडेरीडेन्ट लिमिटेड मानेकनगर येथील कंपनी व्यवस्थापनाने ९६ कंत्राटी कामगारांना बडतर्फे केले होते. त्या कामगारांना भंडारा औद्योगिक न्यायालयाने पूर्ववत कामावर ठेवण्याचे आदेश दिले. हा महत्वपूर्ण निकाल शनिवारी दिला.
युनिडेरीडेन्ट, मानेकनगर तुमसर येथे १० ते १५ वर्षांपासून ९६ रोजंदारी कमागार अल्पशा वेतनावर कार्यरत आहेत. कामगारांनी न्याय हक्काकरिता येथे कामगार संघटना तयार केली. त्यामूळे कपंनी व्यवस्थापनाने या कामगारांना बडतर्फे केले. यासंदर्भात कामगार संघटनेने सहायक कामगार आयुक्त, भंडारा यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. सहायक कामगार आयुक्तांच्या मध्यस्थिनंतर कामगार कामावर पूर्ववत रुजू झाले होते. कपंनी व्यवस्थापनाने षडयंत्र करुन कधी कामावर घेणे, कधी बंद करणे असा क्रम सुरु केला.
सर्व कामगार येथे मुख्य उत्पादनात सहभागी आहेत. दिवस व रात्र पाळीत त्यांनी कामे केलीत कारखान्याला नफा कमवून दिला. कामगारांना कंपनीत नियमानुसार २४० दिवस पूर्ण झाले ओहत. हे कामगार स्थायी कामगाराच्या परिभाषेत मोडतात, पंरतु कपंनी प्रशासनाने वेतन, पी.एफ. व इतर मुलभूत हक्क त्यांना आजपर्यंत मिळाले नाही. स्थायी कामगारांची वागणूक त्यांना मिळाली नाही. याविरोधात न्यायशीर मार्गाने कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालय, भंडारा येथे प्रकरण दाखल केले. जिल्हा औद्योगिक न्यायालयाने सदर प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तोपर्यंत सर्व ९६ कामगारांना कंपनी प्रशासन कामावरुन बंद करणार नाही असा निकाल दिला.
वर्षानुवर्षापासून मुलभूत हक्कापासून कामगाराला कंपनी प्रशासन वंचित ठेवत आहे व शासनाची दिशाभूल करीत आहे. न्यायाधीश एस. एम. शेख यांनी कपंनी प्रशासनाचा अर्ज फेटाळून लावला व कामगारांना स्थगनादेश दिला. कपंनी प्रशासनातर्फे अॅड. हितेश वर्मा यांनी बाजू मांडली तर कामगार संघटनेतर्फे अॅड. सचिन राघोर्ते, अॅड. भोयर, अॅड. रवि वाढई यांनी युक्तीवाद केला. (तालुका प्रतिनिधी)