शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाकडून तपास भरकटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

साकोली तालुक्यातील खैरी पिंडकेपार शेतशिवारात शेतकुंपनात वीज प्रवाह सोडून तीन महिन्यापुर्वी बिबट्याची शिकार झाली. त्याचे कातडे विकण्याची शिकाऱ्यांची तयारी सुरू होती. ग्राहकांचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. बनावट ग्राहक पाठवून कातडीसह सुरूवातीला चौघांना आणि नंतर याप्रकरणातील सुत्रधार दोन भावांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देबिबट कातडीचे प्रकरण : वन्यजीवांच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : वनविभागाला थांगपत्ता नसताना पोलिसांनी बिबट कातडी विकण्याच्या प्रयत्नातील आरोपींना जेरबंद केले. त्यानंतर याप्रकरणाचा तपास वनविभागाकडे देण्यात आला. मात्र आता हा तपास भरकटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बिबटाचे कातडे नागपूर येथील व्यक्तींना विकण्याचा सौदा या आरोपींनी केला होता. मात्र तीन दिवसांपासून वनविभागाच्या हाती काहीही लागले नाही. हाच तपास पोलिसांकडे असता तर या प्रकरणाचे धागेदोरे गवसून मोठे रॅकेट पुढे आले असते.साकोली तालुक्यातील खैरी पिंडकेपार शेतशिवारात शेतकुंपनात वीज प्रवाह सोडून तीन महिन्यापुर्वी बिबट्याची शिकार झाली. त्याचे कातडे विकण्याची शिकाऱ्यांची तयारी सुरू होती. ग्राहकांचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. बनावट ग्राहक पाठवून कातडीसह सुरूवातीला चौघांना आणि नंतर याप्रकरणातील सुत्रधार दोन भावांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बिबट्याचा जबडा जप्त करण्यात आला. हा सर्व प्रकार सुरू असताना वनविभागाला मात्र कोणतीही माहिती नव्हती. सदर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी हात वर केले. आम्हाला काहीच माहित नाही, असे सांगून सुरूवातीला जबाबदारी झटकण्याची तयार केली. मात्र नियमानुसार या प्रकरणाचा तपास वनविभागाकडे आला. वनविभागाने केवळ सोपस्कार पार पाडून आरोपींना ताब्यात घेतले आणि न्यायालयापुढे हजर करून त्यांची वनकोठडी मिळविली. मात्र शिकाºयांना बोलते करण्यात अद्यापही यश आले नाही.रंजीत रामटेके आणि चंद्रशेखर रामटेके या दोन भावंडांनी बिबट्याची कातडी काढून ग्राहकांचा शोध सुरू केला. त्यात त्यांना दुर्याेधन गहाणे, योगेश्वर गहाणे, लक्ष्मीकांत नान्हे, पंकज दिघोरे यांनी सहकार्य केले. नागपूर येथील व्यक्तीला या कातडीची किंमत २० कोटी रूपये सांगण्यात आली होती. पाच कोटी रूपयात सौदा ठरला होता. मात्र त्यांचा डाव मोडून काढला. साधारण व्यक्ती एवढी मोठी रक्कम बिबट्याच्या कातडीवर कशाला खर्च करणार, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. नागपूरच्या त्या व्यक्तींचा शोध घेतल्यास कातडी तस्करी प्रकरणाचे मोठे रॅकेट पुढे येण्याची शक्यता आहे.नेमकी शिकार झाली केव्हा?शिकाºयांच्या अटकेनंतर मार्च महिन्यात लॉकडाऊनच्या काळात तार कुंपणात वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार केल्याची कबूली दिली. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त साकोली तालुक्यातील गावागावात होता. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती. त्यामुळे या शिकाऱ्यांनी बिबट्याच्या शिकारीनंतर कातडे आणि जबडा आपल्या घरापर्यंत कसा आणला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात शिकार केव्हा झाली याचीही माहिती अद्यापपर्यंत वनविभागाला आरोपींकडून काढता आली नाही. आरोपी उच्च शिक्षित असून तल्लख बुद्धीचे आहेत. त्यामुहे त्यांच्याकडून हवी ती माहिती काढणे वनविभागाला शक्य होईल काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.बिबट्यांची संख्या किती?साकोली तालुक्यात नागझिरा अभयारन्याची सीमा आहे. या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. तसेच तालुक्यात ऊसाची लागवडही होत असल्याने त्यातही बिबटे आढळून येत आहे. परंतु बिबट्यांची संख्या नेमकी किती याचा आकडा आजही वनविभागाकडे नाही. दरवर्षी बौद्ध पोर्णिमेला होणारी जनगणना यावर्षी लॉकडाऊनमुळे झालीच नाही. त्यामुळे बिबट्याची संख्या किती हेही कळू शकले नाही.

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या