शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

मतदान केंद्र हलविले, सक्करधऱ्यातील आदिवासींचा मतदानावर बहिष्कार गावातील मूलभूत सुविधा न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीतही बहिष्कार

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: April 19, 2024 6:18 PM

Lok Sabha Election 2024: गावातील मतदान केंद्र हटवले म्हणून आदिवासींचा मतदानावर बहिष्कार, गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्यास येणाऱ्या पुढच्या निवडणुकीतही मतदान न करण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गावातील हक्काचे मतदान केंद्र हटविल्याच्या कारणावरून तुमसर तालुक्यातील आदिवासी सक्करधरा गावात मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला. घानोड येथील मतदान केंद्राकडे मतदार दिवसभर फिरकले नाही. सकाळपासून गावात शुकशुकाट दिसून आला. गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्यास बहिष्काराची भूमिका पुढील निवडणुकीतही कायम राहील, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.

             सातपुडा पर्वतरांगांच्या घनदाट जंगलात असणाऱ्या आदिवासी गावात असणारे मतदान केंद्र दोन किमी अंतरावरील घानोड गावात हटविण्यात आले आहे. हे केंद्र हटविल्यास लोकसभा निवडणुकीत बहिष्कार घातला जाईल, असा इशारा यापूर्वीच गावातील मतदारांनी दिला होता. तहसीलदारांना निवेदनही दिले होते. महिनाभरापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. मतदारांचे मतदान संदर्भात मन वळविण्याचे प्रयत्नही प्रशासकीय यंत्रणेकडून झाले नाही.

गावात मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत असणारे हक्काचे मतदान केंद्र शेजारी असणाऱ्या घानोड गावात हटविण्याच्या निर्णयानंतर गावकऱ्यांनी आधी जाहीर केल्यानुसार मतदानावर बहिष्कार घातला.

गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गावांचे प्रशासकीय कामकाज १३ किमी अंतरावरील धुटेरा गावातून होत आहे. सहा गावे मिळून धुटेरा ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली आहे. परंतु, आदिवासीच्या हक्काच्या योजना, मूलभूत सुविधा, शासकीय योजना व अन्य योजना गावात पोहोचल्या नाहीत. गावात कधी सरपंच व सचिव गावात येत नसल्याने गावकऱ्यांना योजनांची माहिती होत नाहीत. गावात रोहयोचे कामे सुरू करण्यात येत नसल्याने गावकऱ्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामपंचायत दूर असल्याने घानोड आणि सक्करधरा अशा दोन गावांची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. परंतु, सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, अशा अनेक तक्रारी गावकऱ्यांच्या आहेत. या मूलभूत प्रश्नांकडे असेच दुर्लक्ष राहिल्यास पुढील विधानसभा निवडणुकीतही बहिष्काराचा निर्णय राहील, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

गावकऱ्यांच्या अडचणी कुणी ऐकून घेत नाहीत. गावात मतदान केंद्र पूर्ववत देण्यात यावे, हीच आमची मागणी आहे. ती पूर्ण न झाल्यास हा बहिष्कार पुढेही कायम राहील.- संजय सरोते, माजी ग्रामपंचायत सदस्य, सक्करधरा

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४bhandara-acभंडाराElectionनिवडणूकElectionनिवडणूक