९३ हजार बालकांना देणार पोलिओचा डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 09:54 PM2019-03-08T21:54:30+5:302019-03-08T21:54:43+5:30

जिल्हयात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १० मार्च रोजी राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्हयात एकूण ९३ हजार ३०१ बालकांना पोलिओ डोज देण्यात येणार आहे.

Polio dosage to 93 thousand children | ९३ हजार बालकांना देणार पोलिओचा डोज

९३ हजार बालकांना देणार पोलिओचा डोज

Next
ठळक मुद्दे१० मार्चला मोहीम : आरोग्य विभाग सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हयात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १० मार्च रोजी राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्हयात एकूण ९३ हजार ३०१ बालकांना पोलिओ डोज देण्यात येणार आहे.
सन १९९५-९६ पासून पोलिओ निर्मूलन करण्यासाठी भारतात विशेष पल्स पोलिओ राबविण्यात येत आहे. सन २०१० मध्ये डिसेंबरपर्यंत पाच पोलिओ रुग्ण आढळून आले होते. परंतु सन २०११ नंतर राज्यात एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. अथक परिश्रमामुळेच १३ जानेवारी २०११ नंतर आजतागायत एकही पोलीओ रुग्ण आढळून आलेला नाही. भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च २०१४ मध्ये मिळालेले आहे. त्यानुषंगाने जिल्हयात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९१३ बुथ व शहरी भागातील १०६ बुथची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमासाठी २०१४ मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच या मोहिमेंतर्गत अति जोखमेच्या क्षेत्रामध्ये सुध्दा लसीकरण करण्यात येणार आहे. जसे विट भट्टी, झोपडपट्टी, भटक्या जमाती, बांधकाम जागा व इतर मायग्रेटरी भागाचा यात सामावेश आहे. सदर मोहिमेसाठी ७ हजार व्हॉयल लसीचा साठा प्राप्त झाला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालयात सदर मोहिमेसाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की, ज्या प्रमाणे मागील सर्व मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने बुथवर हजर राहून बालकांना पोलिओ डोज पाजून घेतले होते.त्याचप्रमाणे १० मार्च २०१९ जास्तीत जास्त संख्येने बुथवर उपस्थित राहून आपल्या पाच वषार्खालील सर्व बालकांना पोलिओचा डोज पाजावा व आपल्या बाळाला संरक्षित करुन सहकार्य करावे. तसेच बसस्टॅड, रेल्वे स्टेशन, टोल नाका येथे ६० ट्रांझिट बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी ४८ फिरते बुथची व्यवस्था आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेली आहे.

Web Title: Polio dosage to 93 thousand children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.