तामसवाडी रेतीघाटावर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:41+5:30
तुमसर तालुक्यातील तामसवाडी रेतीघाटातून रेतीचा अवैध उपसा सुरु असल्याची माहिती तुमसर पोलिसांना प्राप्त झाली. बुधवारी पहाटे पोलीस उपनिरीक्षक शिखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तामसवाडी घाटावर धाड मारली. त्यावेळी सहा ट्रॅक्टर घाटावर उभे होते. त्यापैकी तीन ट्रॅक्टरमध्ये रेती भरलेली होती. त्या तीन ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर इतर तीन ट्रॅक्टर रिकामे असल्याने त्यांची चौकशी सुरु आहे.

तामसवाडी रेतीघाटावर पोलिसांची धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लॉकडाऊनचा फायदा घेत तालुक्यातील तामसवाडी रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु असून बुधवारी पहाटे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सहा ट्रॅक्टर घेण्यात आले. यापैकी तीन ट्रॅक्टरचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर उर्वरीत तीन ट्रॅक्टरची चौकशी सुरु आहे.
तुमसर तालुक्यातील तामसवाडी रेतीघाटातून रेतीचा अवैध उपसा सुरु असल्याची माहिती तुमसर पोलिसांना प्राप्त झाली. बुधवारी पहाटे पोलीस उपनिरीक्षक शिखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तामसवाडी घाटावर धाड मारली. त्यावेळी सहा ट्रॅक्टर घाटावर उभे होते. त्यापैकी तीन ट्रॅक्टरमध्ये रेती भरलेली होती. त्या तीन ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर इतर तीन ट्रॅक्टर रिकामे असल्याने त्यांची चौकशी सुरु आहे.
सहापैकी केवळ दोनच ट्रॅक्टरवर क्रमांक असून इतर चारवर क्रमांक नसल्याचे पुढे आले. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक निखील सुरेश कोहळे, राहुल कोडे (पचारा), राजेश मुंडे (पचारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने जिल्ह्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. तुमसर तालुक्यासोबतच इतर रेती घाटावरही मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरु आहे.
नागरिकांच्या माहितीवरून कारवाई
तामसवाडी येथील रेतीघाटावर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरु असल्याची माहिती तुमसर पोलिसांना नागरिकांना दिली होती. त्यावरून सापळा रचून कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन काळात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरु असून यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. महसूल आणि पोलीस प्रशासन कोरोना संसर्ग प्रतिबंध उपाययोजनेत व्यस्त असल्याचा फायदा रेतीतस्कर घेत असल्याचे सर्वत्र दिसत आहे.