शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त मोहिमेला पोलिसांचेच असहकार्य

By admin | Updated: November 24, 2014 22:53 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावखेड्यांना शांततेतून समृध्दीकडे जाण्याची नवी वाट दाखविली आहे. पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने ग्रामस्थांना त्या वाटेवरुन मार्गक्रमण करावयाचे आहे.

भंडारा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावखेड्यांना शांततेतून समृध्दीकडे जाण्याची नवी वाट दाखविली आहे. पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने ग्रामस्थांना त्या वाटेवरुन मार्गक्रमण करावयाचे आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत पोलिसांची महत्वाची भूमिका असली तरी पोलिस प्रशासन मात्र फारसी सहकार्याची भावना ठेवत नसल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. एखादा तंटा सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव समितीसमोर आला तर तंटामुक्त समितीला विचारपूर्वक आणि सदसद्विवेकबुध्दीला स्मरुन निर्णय घ्यावा लागतो. कधी कधी दोन्ही पक्षांना मान्य होईल, अशी समाधानकारक तडजोड समितीला करावी लागते. जनतेला पोलिस ठाणे, न्यायालयाच्या वाटा मोकळ्या असल्या तरी पैसा व वेळेची नासाडी आणि मानसिक त्रास कुणालाच नको असतो. तंटामुक्त समिती समित्यांना प्रोत्साहन तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात पोलिस प्रशासनाची महत्वाची भूमिका आहे. मात्र काही अपवाद वगळले तर पोलीस वर्तुळात तंटामुक्तीविषयी निरुत्साह असल्याचे बहुतांश अध्यक्ष सांगतात. लाखो लोकसंख्या असलेल्या जिल्हयाची कायदा आणि सुव्यवस्था राबविण्याची जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळताना पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो. तंटामुक्ती गाव समितीची अंमलबजावणीचे काम स्थानिक पातळीवर पोलिस स्टेशनमधील गोपनीय शाखेच्या एक किंवा दोन कर्मचाऱ्यांकडे देण्यात येते. इतर कामाबरोबरच तंटामुक्तीचे अतिरिक्त काम कर्मचारी करीत असले तरी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्याची आवश्यकता आहे. कायद्याच्या ज्ञानाबरोबरच सामाजिक सुसंवादाचे ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्याकडे तंटामुक्तीची जबाबदारी सोपविण्यास तंटामुक्तीचे काम अधिक प्रभावी होऊ शकते. काळाची महिमा म्हणा अगर आधुनिक पहाटेच्या उजेडासोबतच गावचे गावपण हरवत चालले आहे. काही वर्षापूर्वी सगळे गाव शेजारच्या घरातील दु:खाचा आलेखही शेजारच्या चेहऱ्यावर उमटत नाही. त्यामुळे सत्ता, राजकारण जातीयवादामुळ विस्कटलेली गावाची घडी नीट बसविण्यासाठी शासनाने तंटामुक्त गाव अभियान हाती घेतले आहे. त्यामुळेच हे अभियान एक मोहीम न राहता तंटामुक्ती वास्तवात उतरल्यास महात्मा गांधीच्या स्वप्नातला भारत साकार होण्यास वेळ लागणार नाही. (नगर प्रतिनिधी)