शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात

By admin | Updated: October 14, 2014 23:13 IST

भंडारा, तुमसर व साकोली विधानसभा क्षेत्रासाठी उद्या मतदान होत आहे. निवडणुकीदरम्यान घातपात किंवा अनुचित घटनेची शक्यता लक्षात घेता, जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

भंडारा : भंडारा, तुमसर व साकोली विधानसभा क्षेत्रासाठी उद्या मतदान होत आहे. निवडणुकीदरम्यान घातपात किंवा अनुचित घटनेची शक्यता लक्षात घेता, जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यात १७ मतदान केंद्र नक्षलप्रभावित क्षेत्रात येतात. ९ मतदान केंद्र संवेदनशील असल्यामुळे त्याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्याबळ अपुरी असल्याने बाहेरून पोलीस कुमक बोलविण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांनी सीआरपीएफच्या १४७ व अन्य ६४ प्रकरणांची नोंद असलेल्या २११ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यातील २७२ व्यक्तींकडून प्रतिबंधात्मक कारवाईचे बाँड लिहून घेण्यात आले आहे.भंडारा जिल्ह्यात १२ स्थिर सर्व्हेक्षण व भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यात महसुल अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ४८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भंडारा क्षेत्राची मतमोजणी पोलीस बहुउद्देशीय सभागृह, तुमसरची औद्यागिक प्रशिक्षण संस्था व साकोलीची तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे. मतदानानंतर येथील स्ट्रांगरूममध्ये ठेवण्यात येणाऱ्या ईव्हीएम पेटीच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त राहणार आहे. नक्षल प्रभावित क्षेत्रजिल्ह्यातील १७ गावे नक्षलप्रभावीत क्षेत्रात येतात. त्यात आतेगाव, कुठेझरी, उमरझरी, उसगाव, सातवाडा, जाभळी खांबा, वडेगाव, सितेगाव टोला, सालई, गोंडउमरी, वांगी, विहिरगाव व पिंपळगाव यांचा समावेश आहे. तर निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यातील ९ मतदान केंद्रांना संवेदनशील असल्याचे त्यांच्या अहवालात नमुद केले आहे. त्यात भंडारा विधानसभा क्षेत्रातील ८ व साकोलीतील एका केंद्राचा समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)