गोसीखुर्द धरणाच्या रस्त्याची दुर्दशा

By Admin | Updated: September 14, 2014 23:55 IST2014-09-14T23:55:22+5:302014-09-14T23:55:22+5:30

राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या रस्त्याची पूर्णत: दुर्दशा झालेली आहे. त्याचा त्रास येणाऱ्या पर्यटकांना व सामान्य जनतेला सोसावा लागत आहे. तरीही लोकप्रतिनिधी

Plight of Gosikhurd dam road | गोसीखुर्द धरणाच्या रस्त्याची दुर्दशा

गोसीखुर्द धरणाच्या रस्त्याची दुर्दशा

गोसे (बुज) : राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या रस्त्याची पूर्णत: दुर्दशा झालेली आहे. त्याचा त्रास येणाऱ्या पर्यटकांना व सामान्य जनतेला सोसावा लागत आहे. तरीही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
गोसीखुर्द मुख्य धरणापासुन राजीव टेकडी व मेकॅनिकल वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यांची जलविद्युत प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पुर्णत: वाट लावून टाकली आहे. याकडे धरण विभागाचे अधिकारी मुद्दामपणे दुर्लक्ष करीत आहेत. गोसीखुर्द पासून पवनीकडे येणाऱ्या रस्त्यामध्ये कुर्झा ते सिंदपुरी रस्त्यामध्ये मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्याची संख्या जवळपास ४०० पर्यंत आहे. या दोन्ही रस्त्यामध्ये पावसाचे पानी जमा झाल्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यांवर साधी सायकल चालू शकत नाही तर दुसरे वाहन कुठून चालणार? या रस्त्याचे डांबरीकरण न करता सिव्हील वसाहत ते कुर्झा हा रस्ता चांगला असतानाही याचे डांबरीकरण करण्याचे संबंधित विभागाने शहाणपण केले आहे. हा मार्ग दुरुस्त करुन देण्याची मागणी या परिसरातील जनतेने अनेक वेळा केली पण दुर्लक्ष करण्यात आले.
या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना एक एक खड्डा वाचवत यावे लागते. गोसीखुर्द धरणाला रोजच मोठया प्रमाणात पर्यटक येतात. पण या राष्ट्रीय प्रकल्पच्या रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्यांना ही त्रास सहन करावा लागतो. तरीही लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी या ज्वलंत समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Plight of Gosikhurd dam road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.