कमांडो ग्रुपतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:12+5:302021-06-21T04:23:12+5:30

शहापूर : जंगल करा घनदाट, सळसळेल रक्त मनगटात, झाडे लावा सृष्टी हिरवीगार करा, जेव्हा होईल झाडांमधे वृध्दी, तेव्हांच वाढेल ...

Plantation by Commando Group | कमांडो ग्रुपतर्फे वृक्षारोपण

कमांडो ग्रुपतर्फे वृक्षारोपण

Next

शहापूर : जंगल करा घनदाट, सळसळेल रक्त मनगटात, झाडे लावा सृष्टी हिरवीगार करा, जेव्हा होईल झाडांमधे वृध्दी, तेव्हांच वाढेल जीवनात समृध्दी, असा कानमंत्र देत कमांडो ग्रुप, गोपीवाडातर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. गोपीवाडा गावातील कमांडो ग्रुपतर्फे वृक्षारोपण, बीजारोपण, गुळवेल लावण्याबाबत २०२० मध्ये संकल्प केला होता. स्वत: झाडे तयार करून कमीत - कमी पाच ते दहा हजार झाडे लावू म्हणून १९ मेपासून कमांडो ग्रुपने गोपीवाडा ते बलाची पहाड़ी व बलाची पहाड़ी येथे ७००० हजार झाडे लावली. त्यामध्ये २००० हजार बीज रूजवली. पाच हजार झाडे लावली, तर ३०० गुळवेल लावली. ऑक्सिजन निमिर्तीकरिता चंद्रशेखर डोळस यांनी हा निर्णय घेतला. वृक्षारोपणप्रसंगी संस्थापक चंद्रशेखर डोळस, सामाजिक कार्यकर्ता आदेश कानतोडे, साहील राऊत, रितीक देवगडे, महेश सार्वे, कुणाल कोरे, सौरभ सिंदपुरे, सोहन बाभरे, अनुप आतिकर, भरत विशाल, यशपाल, मस्के, गभणे, विक्की, लक्की, सागर, लखन, करण, अमित, गायत्री, नागरे, श्रेया शेंडे, गायत्री शेंडे कमांडो ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Plantation by Commando Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.