शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:34 AM

धान उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. शेतकरी बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करतो. उत्पन्न घेण्यास अडचणी ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. शेतकरी बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करतो. उत्पन्न घेण्यास अडचणी येत असतात. केवळ आठ तास वीजपुरवठा केल्याने शेती पिकविण्यास अडचणी येतात. विंधन विहिरीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. धान पिकाला लावलेली मजुरी, खत, बियाणे व इतर खर्चाचा विचार करता शेतकऱ्याला पुरेसे उत्पन्न मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो. मुलामुलींचे शिक्षण व लग्नही करू शकत नाही. अशावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना घडताना दिसून येत असल्याचे रणवीर भगत यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. लाखनी तालुक्यातील गडेगाव, गोंडसावरी, सावरी, मुरमाडी (सावरी), लाखनी, लाखोरी, सालेभाटा, केसलवाडा (पवार), मोरगाव, पिंपळगाव (सडक) ह्या तलाठी सजातील ३२ गावांना ७ हजार ५५३ हेक्टर आर शेती क्षेत्र नवीन नहराद्वारे सिंचन करता येणार आहे. साकोली तालुक्यातील ८ हजार ३२० हेक्टर आर शेती क्षेत्रातील १७ गावांना नवीन नहराचा लाभ होऊ शकतो, असे निवेदनात भगत यांनी स्पष्ट केले आहे. तलावात नहराचे पाणी सोडल्यास शेतीला पाणीपुरवठा करता येईल. लाखनी व साकोली तालुक्यातील किन्ही, गडेगाव, रेंगेपार (कोठा), खुर्सिपार, लाखोरी, निलागोंदी, सालेभाटा, चिखलाबोडी, एकोडी, बाम्पेवाडा, उसगाव, चांदोरी, पिंडकेपार, घानोड येथील मोठ्या जलाशयात गोसेखुर्द नहराचे व उपसा सिंचनाचे पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळेल.