पेट्रोलपंपचे ‘छत्र’ हरविले
By Admin | Updated: August 7, 2016 00:20 IST2016-08-07T00:20:11+5:302016-08-07T00:20:11+5:30
आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्था जवाहरनगर संचालित पेट्रोल पंपवर छत नाही.

पेट्रोलपंपचे ‘छत्र’ हरविले
आयुध निर्माणी पतसंस्थेचा पंप : ग्राहकांच्या सोयींकडे दुर्लक्ष
प्रल्हाद हुमणे जवाहरनगर
आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्था जवाहरनगर संचालित पेट्रोल पंपवर छत नाही. पावसाळ्यात ग्राहकांना पेट्रोल व डिझेल भरणे त्रासदायक ठरत आहे. ग्राहकांना मुलभूत सोईसुविधा पुरविने भारत पेट्रोलीयमची जबाबदारी असताना याकडे पतसंस्था व अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.
भंडारा जिल्हा एकमेव सहकारी तत्वावर पेट्रोलपंप सुरू आहे. येथे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पणावर असलेली आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची देखरेख आहे. येथे जवाहरनगर, पिपरी, साहुली, पेवठा, लोहारा, कोंढी, परसोडी, राजेदहेगाव, खरबी, ठाणा, चिखली, निहारवाणी येथील शेतकरी, आयुध निर्माणीचे दैनिक कर्मचारी व राष्ट्रीय महामार्गावर असल्याने ये-जा करणारे वाहन चालक या पेट्रोलपंपचा वापर करीत असतात. हा पेट्रोलपंप ग्रामपंचायत ठाणा येथील हद्दीत आहे.
हा पेट्रोलपंप पतसंस्थेने २०१५ पर्यंत लिजवर भारत पेट्रोलीयम यास चालविण्यासाठी दिले आहे. या ठिकाणी आधी विस्तीर्ण आच्छादन होते. राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणामुळे भुईसपाट झाले. नव्याने पेट्रोल व डिझेल मशीन स्थापित करण्यात आली.
मात्र सुमारे एक वर्षांचा कालावधी होत असतानाही छत नाही. सदर तीनही मशिनवर आच्छादन भारतीय पेट्रोलीयम कंपनीने तयार करून द्यायला हवे. पावसाळ्यामुळे वाहनांच्या वर्दळीने मशीन लगत खोल खड्डे पडले आहे. ग्राहकांना पिण्याचे पाणी, शौचालय व हवा केंद्र येथे नाही. येथील कार्यरत कर्मचारी रेनकोट वापरून ग्राहकांना पेट्रोल व डिझेलची विक्री करतात. येथे इथेनॉलयुक्त पेट्रोल वितरक असल्याने भरतांना वाहनांमध्ये पाण्याचा थेंब गेले असता वाहन नादुरूस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पेट्रोलपंपाची जबाबदारी भारत पेट्रोलीयम कंपनीकडे आहे. ग्राहकांसाठी सुविधा पुरविणे कंपनीची जबाबदारी आहे. अधिकारी येथील पेट्रोलपंपकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत आहे. समस्याबाबत कंपनीला वारंवार माहिती देण्यात आली आहे. ग्राहक सुविधा देण्यास भारत पेट्रोलीयम दुर्लक्ष करीत आहे.
-विनोद मेश्राम,
अध्यक्ष, आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी संस्था, जवाहरनगर.
पेट्रोलपंप येथील मुलभूत सुविधा तेथील खरेदी विक्रीवर अवलंबून असते. उत्पन्नाच्या सोळा टक्के आम्हाला खर्च करता येतो. एमएसडी यांच्या मार्गदर्शनात कारभार चालतो. महिनाभरात समस्या निकाली निघेल.
-कुंदन अवसरे,
सेल्स अधिकारी भारत पेट्रोलीयम कंपनी, नागपूर.