शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

अवघ्या महिनाभरात उखडला डांबरी रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे बांधकाम करीत आहे की, लोकांच्या मरणाची व्यवस्था, असा प्रश्न वाहतुकदार विचारीत आहेत. भंडारा ते खडकी रस्त्या वाहतुकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होत असतानाच दुसरीकडे अल्पावधीत रस्त्याचे बेहाल होत आहेत.

ठळक मुद्देअंधेर नगरी-चौपट राजा : करचखेडा ते खमारी रस्त्याचे बांधकाम निकृष्ट, चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करचखेडा ते खमारी रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडाराचे वतीने महिनाभरापूर्वी डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बीबीएमचे काम अंतिम टप्प्यात आले असताना निकृष्ट बांधकामामुळे बीबीएम पूर्णत: उखडून रस्त्यावर गिट्टीचा पसारा पडला आहे. वाहन चालकांचा जीव संकटात सापडला आहे.रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे बांधकाम करीत आहे की, लोकांच्या मरणाची व्यवस्था, असा प्रश्न वाहतुकदार विचारीत आहेत.भंडारा ते खडकी रस्त्या वाहतुकदारांसाठी मृत्यूमार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे रस्त्याचे डांबरीकरणाचे काम होत असतानाच दुसरीकडे अल्पावधीत रस्त्याचे बेहाल होत आहेत.शासनाने कोट्यवधी रुपये रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणावर खर्च होत असताना रस्ते वर्षभर नाही तर सहा महिनेही का टिकाव धरत नाही, हा चौकशीचा विषय आहे.भंडारा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने महिनाभरापूर्वी करचखेडा ते खमारी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले.करचखेडा ते बेरोडी पर्यंतच्या भागात बीबीएम करण्यात आले. परंतु कारपेट झालेले नाही. रस्ता अनेक ठिकाणाहून खड्ड्यांनी बरबटलेला आहे. त्यानंतर सुरेवाडा ते खमारी दरम्यान बीबीएमचे काम सुरु करण्यात आले. एकेरी बीबीएम पूर्ण झाले असतानाच बीबीएममधील खडी उखडून रस्त्यावर पसरलेली आहे. जुना रस्ता वाहतुकदारांना दिसत आहे.रस्त्यावरील बीबीएम पूर्णत: उखडला असून निकृष्ट बांधकामाचे पाप लपविण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी या गैरप्रकाराकडे डोळेझाक करीत आहेत.‘अंधेर नगरी, चौपट राजा’सारखी परिस्थिती या मार्गावर दिसून येत असल्याने वाहतुकदारांमध्ये कमालीचा असंतोष आहे. वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे.पावसाळ्यामुळे बीबीएम मातीत दाबल्या गेलेपावसाळ्यापूर्वी बेलगाव ते खमारी पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम सुरु करण्यात आले. बीबीएम झाले असताना काम थांबविण्यात आले. पावसाळ्यात बीबीएम झालेल्या रस्त्याची वाट लागली आहे. खड्ड्यांमुळे अपघात बळावले होते. बीबीएम अनेक ठिकाणी मातीत दाबल्या गेला. पावसाळ्यानंतर खड्ड्यांची नावापुरती डागडुजी करण्यात आली. परंतु या रस्त्यावर अजूनही वाहन चालविताना कसरत करावी लागते. कारपेट अजूनही झालेले नाही.गैरप्रकाराला अधिकाऱ्यांचे पाठबळवर्षभरापूर्वी खडकी ते ढिवरवाडा रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात आले. परंतु बांधकामाच्या महिनाभरापासून रस्त्याला खड्डे पडणे सुरु झाले. जुना रस्ता डोके वर काढून डोकावू लागला. खड्ड्यांची संख्या वाढून आज रस्त्याचे बेहाल झाले आहे. बांधकामाचा फटका या रस्त्यावरील सर्व नागरिकांना भोगावा लागत आहे. नागरिकांनी अनेकदा चौकशीची मागणी केली असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडस न करता पाठबळ दिल्याचे दिसून आले. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा