आता प्रवाशांना बस स्थानकात ताटकळत बसावे लागणार नाही, एसटी बसचे लाईव्ह लोकेशन कळणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST2021-07-08T04:23:42+5:302021-07-08T04:23:42+5:30
बॉक्स सहा बसस्थानकात लागले मोठे स्क्रिन .... प्रवाशांना आपल्या बसची वेळ कळावी, बसचा मार्ग व इतर माहिती मिळावी ...

आता प्रवाशांना बस स्थानकात ताटकळत बसावे लागणार नाही, एसटी बसचे लाईव्ह लोकेशन कळणार...
बॉक्स
सहा बसस्थानकात लागले मोठे स्क्रिन ....
प्रवाशांना आपल्या बसची वेळ कळावी, बसचा मार्ग व इतर माहिती मिळावी यासाठी भंडारा, तुमसर, साकोली, पवनी,
तुमसर, तिरोडा, गोंदिया बसस्थानकात मोठे स्क्रिन बसवण्यात आले आहेत. भंडारा विभागातील प्रत्येक आगारात तसेच भंडारा मध्यवर्ती बसस्थानकात या स्क्रिनसह इतर माहिती प्रवाशांना मिळत आहे. एसटी महामंडळाकडून बसची वेळ अथवा इतर माहिती देण्यासाठी चौकशी विभाग कार्यान्वित असला तरी स्क्रिन लागल्यानंतर प्रवाशांना माहिती विचारण्याची गरज भासणार नाही.
बॉक्स
चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप
एसटीमध्ये बसविण्यात येणाऱ्या नवीन लाईव्ह लोकेशनमुळे चालकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच चालकांकडून होणाऱ्या निष्काळजीपणाला यामुळे चाप बसू शकतो. एसटी बसचे प्रत्येक लोकेशन आज घडीला एसटीच्या आगारप्रमुख, बसस्थानक प्रमुख तसेच एसटीच्या विभागीय वाहतूक अधिकारी, एसटीचे विभागीय नियंत्रक या अधिकाऱ्यांना दिसणार आहे. त्यामध्ये ड्रायव्हर एसटीचे ब्रेक कसे मारतो, बसची स्पीड किती आहे, ड्रायव्हिंग कशी करत आहे यासह इतर विविध कारणांचा आढावा घेण्यासाठी ही नवीन लाईव्ह लोकेशन टेक्नॉलॉजी फायदेशीर ठरणार आहे.
बॉक्स
प्रवाशांना मिळणार अपडेट .....
वेळेवर माहिती मिळावी म्हणून पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम पीआयएस ही नवीन सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. एसटी बसेसवर देखरेख ठेवण्यासाठी याची मदत होणार आहे. व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम कार्यान्वित झाली असून यातून विविध रिपोर्ट कळणार आहेत. भविष्यात यातून एक मोबाईल ॲप तयार करण्यात येणार असून प्रवाशांना त्यातून प्रत्येक अपडेट मिळू शकेल.
स्टेटमेंट
भंडारात पीआयएस प्रणाली कार्यान्वित....
एसटी महामंडळाने रेल्वेप्रमाणे प्रवाशांना लोकेशनची सुविधा सुरू केली आहे. भंडारा विभागात व्हीटीएस आणि पीआयएस अशा दोन्ही सिस्टिम सर्व एसटी बसमध्ये कार्यान्वित झाल्या आहेत. महत्त्वाच्या सातही आगारात प्रवाशांसाठी बसस्थानकात मोठे स्क्रिन लावले असून यातून प्रवाशांना बसची वेळ, प्रवासाचा मार्ग, बस कोठे आहे, कधी पोहचणार अशी सर्व माहिती मिळणार आहे. ही सुविधा भंडारा विभागात सुरू झाली आहे.
डॉ. चंद्रकांत वडस्कर,
विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा