शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटांच्या आॅनलाईन आरक्षणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:15 IST

तिकिटांच्या आॅनलाईन आरक्षणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याची विचित्र परिस्थीती तुमसर बस आगारात पहावयास मिळत आहे. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास या ब्रीद वाक्याची सार्थकता म्हणून महाराष्ट्र परिवहन मंडळाने शिवशाही ही खास बस सेवा सुरु केली आहे.

ठळक मुद्देतुमसर बस आगारातील प्रकार

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तिकिटांच्या आॅनलाईन आरक्षणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याची विचित्र परिस्थीती तुमसर बस आगारात पहावयास मिळत आहे. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास या ब्रीद वाक्याची सार्थकता म्हणून महाराष्ट्र परिवहन मंडळाने शिवशाही ही खास बस सेवा सुरु केली आहे. त्याचे लोकार्पण राज्याचे परिवहन मंत्री यांच्या मार्फत चालू वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आली होती. शिवशाही ही विना थांब्याची वातानुकुलित बस सेवा म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र एसटीची टिकीट आॅनलाईन पद्धतीनेही आरक्षीत केली जाते याची सामान्य प्रवाशांना साधी कल्पनाही नाही. मात्र त्यामुळेच प्रवाशांमध्ये बस मधील सिटकरीता शाब्दीक वाद हे नित्याचे झाले आहे.तुमसर बस आगारातून शिवशाही व्यतिरीक्त परिवर्तन डे-आॅर्डनरी, परिवर्तन आॅर्डनरी एक्सप्रेस व डे-आॅर्डनरी या प्रकारच्या बस फेऱ्या प्रत्येक दिवसाला ठरविल्या जातात. त्यात नित्य धावणाºया सर्वसाधारण ते शिवशाही पर्यंत सर्व बसेसकरीता आॅनलाईन टिकीट आरक्षीत केली जाऊ शकते. मात्र त्या सुविधेचा नेमका वापर सुशिक्षीत व तंत्रज्ञानाचा वापर करणाºया प्रवाशी वर्गाकडूनच केला जातो. त्याचाच नेमका त्रास एसटीने प्रवास करणाºया सर्वसाधारण प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सर्वसाधारण प्रवाशी व आॅनलाईन पद्धतीने टिकीट आरक्षीत करणारा प्रवाशी बसमध्ये नेमक्या सिटकरीता तूतू-मैमै करत असल्याची माहिती समोर आलेली आहे.महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या संकेत स्थळावर तिकीट आॅनलाईन बुक करण्याचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र त्या सुविधांबाबतचे फलक तुमसर बस आगारात अद्याप लावण्यात आलेले नाही. माहितीच्या अभावामुळे प्रवाशीच प्रवाशांसोबत शाब्दीक वाद घडवून आणत आहेत. मात्र यावर उपाय म्हणून प्रवाशांमध्ये मध्यस्ती करण्याव्यतिरीक्त बस आगारामार्फत कसलेच प्रयत्न केले जात नाही. तुमसर बस आगारात येणाºया जाणाºया प्रत्येक बसचे प्रीरिकॉर्डेड आॅनलाईन अनाऊंमेन्ट केले जाते. फावल्या वेळेत जाहिरातीचे प्रसारणही केले जाते. मात्र एखाद्या बसमध्ये ठराविक सिट आरक्षित असल्याची किंवा तसे करण्याची माहीती अनाऊंन्स केली जात नाही. दिवसाला येथे हजारो प्रवासी बसने प्रवास करतात.परिवहन मंडळाच्या लिंकवर कोणत्याही बसकरीता सिट बुक करण्याची सोय करुन देण्यात आली आहे. औपचारिक सुविधेव्यतिरिक्त रेड-बस, गो-आयबीबो या सारख्या खाजगी पोर्टलवरुनही आपल्या आवडीच्या सिटकरीता टिकीट बुक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्या सुविधांच्या प्रसिद्धीचे तुमसर आगाराला विसर पडल्याचे दिसते.शिवशाहीने तुमसर मार्गे नागपूर प्रवासादरम्यान बस स्थानकावर आरक्षित सिटकरीता प्रवाशांनी शाब्दीक घडवून आणला होता. बस आगारातील अधिकाºयांच्या मध्यस्थीनंतर तो वाद संपुष्टात आला. मात्र सिट आरक्षीत करणाºयाला आपली जागा सोडावी लागली. येथे तुमसर आगारात माहितीचा व नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.-संकेत धोत्रे, तुमसर (प्रवासी)