पक्ष संघटनेत विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक
By Admin | Updated: March 8, 2016 00:29 IST2016-03-08T00:29:29+5:302016-03-08T00:29:29+5:30
खासदार प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल व आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत आहे.

पक्ष संघटनेत विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक
पूर्णा पटेल यांचे प्रतिपादन : तुमसर येथे विद्यार्थी युवक राष्ट्रवादी काँग्रेसची सभा
तुमसर : खासदार प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल व आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवारात विद्यार्थ्यांचा सहभाग नगण्य आहे. पटेल परिवार राजकारण कमी व समाजकारण जास्त करतो. स्व.मनोहरभाई पटेल यांच्याकडून वारसा चालत आलेला आहे. तळागाळातील लोकांकडे शिक्षण पोहचायला हवे, हे त्यांचे स्वप्न होते. जाती धर्माच्या नावावर जातीयवादी शक्ती देश पातळीवर डोके वर काढत आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व पूर्णा पटेल यांनी केले.
तुमसर येथील अग्रसेन भवन सभागृहात शनिवारला विद्यार्थी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे हे होते. अतिथी म्हणून विद्यार्थी नेते निखील जैन, केतन तुरकर, जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष स्वप्नील नशिने, युवती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, तुमसर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष धनेंद्र तुरकर, तुमसर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष अंकुश ठाकुर, तुमसर शहर युवक राष्ट्रवादी अध्यक्ष निशीकांत पेठे, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, विजय डेकाटे, योगेश सिंगनजुडे, डॉ.सच्चिदानंद फुलेकर, सभापती शुभांगी रहांगडाले, भाग्यश्री निखाडे, नगरपरिषद उपाध्यक्ष सरोज भुरे, विद्यार्थी विद्यार्थिनी, युवक युवती पदाधिकारी उपस्थित होते.
पूर्णा पटेल म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवारात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने नागपूर विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या हजारो महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नितेश फुलेकर जे विद्यार्थी कल्याण समितीचे नागपूर विद्यापीठ सदस्य, नागपूर विद्यापीठ सिनेट मेंबर, नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी माजी अध्यक्ष यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न समजून घेवून ते प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले. संचालन प्रा.राम माधवानी व आभार प्रदर्शन प्रा.प्रविण कामथे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)