राज्य शासनाच्या मंत्रीमंडळ विस्तारात तीन केंद्रीय मंत्री व दहा राज्यमंत्री यांनी शपथ घेतली. त्यामध्ये भंडारा-गोंदिया चे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांना राज्यमंत्रीपदाची शपथ घेताच जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...
उठा रे बाळानों सकाळ झाली. झोपू देनं ग आई, आई चाय झाला का. भूख लागली जेवायला दे, असा आईशी होणारा दररोजचा संवाद व हाक देणारी शिवलालची दोन पोर रुग्णालयात उपचार घेत आहेत. हक्कासाठी लढणाऱ्या या पोरांच बालपण प्रशासनात हिरावून घेतलं आहे. ...
तापमानात प्रचंड वाढ झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली. विहिरी, नदी, नाले कोरडे पडले, परंतु देव्हाडी शिवारातील कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो होऊन भर उन्हाळ्यात वाहत आहे. सदर पाण्याने राष्ट्रीय महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे. ...
भंडारा शहरातील सामाजिक स्तरात बदल होत असतानाच सुरक्षितताही हरवत चालल्याची भावना दिसून येत आहे. शहरातील काही भागात चोरी छुपे दारुची विक्री होत असल्याने सायंकाळी ६ वाजतानंतर काही चौकांमध्ये तर मद्यपींची जत्राच भरली आहे, असे जाणवते. ...
शहर व तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. सुसाट वाऱ्यात अनेक घरांचे पत्रे उडाले. अचानक पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सुमारे पाऊणतास पाऊस बरसला. ग्रामीण परिसरात झाडे उन्मळून पडल्याची माहिती ...
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यापैकी रेशमी उद्योग हा शेती पुरक उद्योग असल्याने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. परंतु शासकीय धोरणानुसार लाभार्थ्यांना देयकासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याने हा उद्योग संकट ...
३३ कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून केवळ वृक्षलागवड इथपर्यंतच हा कार्यक्रम सिमीत न ठेवता वृक्ष संगोपणाचे नियोजन करावे, अशा सुचना आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी दिल्या . ...
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. याबाबतचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे. आता ...
मोहाडी तालुक्यातील नेरी ग्रामस्थांचा सहा महिन्यापासून अवैध रेती उत्खनन विरुद्ध लढा सुरु आहे. नदी पात्रातील रेती उत्खननाने कोरडी पडलेल्या नदीत पाणी नसल्याने गावातील पाणी पुरवठा प्रभावित झाल्याची रीतसर तक्रार तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना केली होती. ...