जुलै महिन्याच्या अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची रोवणीसाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी मिळेल त्या साधनांनी चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने रोवणी करीत आहेत. ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या ई-कार्डचे उद्दिष्ट दोन आठवड्यात पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्याला ६ लाख ११ हजार ई-कार्ड बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
पंतप्रधान किसान सन्मान निधीयोजनेच्या वैयक्तिक व सामायिक संयुक्त खातेदारांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर १५ आॅगस्ट पर्यंत अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.नरेश गित्ते यांनी दिल्या. या योजनेत पहिल्या टप्प्यात १ लाख ५४ हजार १३८ वैयक्तिक तर १ लाख ...
राज्यातील ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वतीने येथील त्रिमूर्ती चौकात भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेले प्रत्येक जण छत्र्या घेऊन होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा ...
दीर्घ विश्रांतीनंतर गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून या पावसाने शेतकरी सुखावला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात २८.५ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पवनी तालुक्यात १०६.४ मिमी पाऊस झाला आहे. ...
मोहाडी तालुक्यातील महालगाव येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून भिंतीलर तडे गेले असून कवेलूही फुटलेले आहे. ही इमारत केव्हाही कोसळू शकते. विद्यार्थ्याना ग्रामपंचायतीच्या इमारतीत शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. या इमारतीची डागडुजी करण्याची मा ...
जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० साठी निधी मागणीचे प्रस्ताव कार्यान्वीत यंत्रणांनी तात्काळ सादर करावे, निधी प्राप्त करून घेवून वेळेत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची राहणार असून निधी खर्चाचे वेळापत्रक तयार करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ...
आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांची नावे बाद असल्याची माहिती पुढे आली आहे. अधिकाऱ्यांच्या चुकांचा गोर-गरीब जनतेला फटका बसत आहे. त्यामुळे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे. ...
पावसाळा सुरू होवून सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटला तरीही आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पात जलसाठा निरंक आहे. सध्या या प्रकल्पात मृतसाठा ७.५० टक्के असून ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. ...