१ लाख ८४ हजार सामायिक खातेदार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 10:16 PM2019-07-30T22:16:05+5:302019-07-30T22:18:57+5:30

पंतप्रधान किसान सन्मान निधीयोजनेच्या वैयक्तिक व सामायिक संयुक्त खातेदारांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर १५ आॅगस्ट पर्यंत अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.नरेश गित्ते यांनी दिल्या. या योजनेत पहिल्या टप्प्यात १ लाख ५४ हजार १३८ वैयक्तिक तर १ लाख ८४ हजार ५४० सामायिक खातेदार पात्र ठरले आहेत.

1 lakh 3 thousand shared account holders eligible | १ लाख ८४ हजार सामायिक खातेदार पात्र

१ लाख ८४ हजार सामायिक खातेदार पात्र

googlenewsNext
ठळक मुद्देपीएम किसान योजनेचा आढावा : पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पंतप्रधान किसान सन्मान निधीयोजनेच्या वैयक्तिक व सामायिक संयुक्त खातेदारांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर १५ आॅगस्ट पर्यंत अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.नरेश गित्ते यांनी दिल्या. या योजनेत पहिल्या टप्प्यात १ लाख ५४ हजार १३८ वैयक्तिक तर १ लाख ८४ हजार ५४० सामायिक खातेदार पात्र ठरले आहेत. पहिल्या टप्प्यातील ६२ हजार ५६७ खातेदारांची यादी निधी जमा करण्यासाठी शासनाला पाठविली आहे.
पंतप्र्नधान किसान सन्मान निधी योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी घेण्यात आली. या बैठकीला प्रभारी अपर जिल्हाधिकारी विलास ठाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
पीएम किसान योजनेत पहिल्या टप्प्यात १ लाख ५४ हजार १३८ खातेदारांपैकी ४ हजार २७८ खातेदारांची माहिती संकेत स्थळावर अपलोड करणे शिल्लक आहे. ही माहिती तात्काळ अपलोड करावी अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ.गित्ते यांनी दिली.
पीएम किसान योजना प्राधान्याचा कार्यक्रम असून उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी ग्रामसेवक, तलाठी यांच्या तात्काळ बैठका घेऊन पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलीत करून संकेतस्थळावर अपलोड करावी, सामूहिक खातेदारांची माहितीसुद्धा बिनचूक अपलोड करण्यात यावी, या याद्या ग्रामपंचायतीला प्रसिद्ध करण्यात याव्यात, ज्या खातेदारांचे बँक खातेदारांचे खाते क्रमांक चुकीचे आहेत ते तात्काळ दुरुस्त करून घ्यावे यासाठी बँकांशी संबंध साधून राबविण्याची सूचना या बैठकीत देण्यात आली.
सामूहिक व संयुक्त खातेदारांची माहिती संकलीत करताना विधवा, परितक्त्या महिलांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, खातेदारांची माहिती भरताना डेटा अचुक असावा याकडे लक्ष द्यावे, पीएम किसान योजनेची मुख्य जबाबदारी कृषी विभागाची असून कृषी विभागाने अन्य विभागाच्या समन्यवयाने ही योजना कालमर्यादित यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी यंत्रणेला सहकार्य करावे-जिल्हाधिकारी
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांना ६ हजार रुपये वार्षिक रक्कम देण्याचे प्रावधान आहे. या योजनेचा दर आढवड्याला आढावा घेण्यात येणार आहे. प्रत्येक यंत्रणेने याद्या विविध मर्यादेत अपलोड कराव्यात. या योजनेत पात्र वैयक्तिक व सामायिक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.नरेश गित्ते यांनी केले आहे. यासाठी अधिकाºयांनीही शेतकºयांना या योजनेबद्दल माहिती देऊन त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

Web Title: 1 lakh 3 thousand shared account holders eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.