सध्या नागरिकांच्या मोबाईलवर एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केले आहे. लिंकवर संपर्क केल्यास पैसे मिळतील असा तो संदेश आहे. मात्र या संदेशाने अनेकांची फसवणूक केली असून त्यामुळे नागरिकांनी सावध ...
पवनीपासुन तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावरील पत्र्त्रा मेत्ता संघद्वारा निर्मित ऐतिहासिक प्राचीन बुध्द नगरी, भारत-जपानच्या मैत्रीचे प्रतिक ठरलेल्या रुयाळ सिंदपूरी येथील महासमाधीभुमी महास्तुपाला १२ वर्ष पूर्ण होत आहे. ...
भाताचे कोठार असलेला भंडारा हा उत्सवप्रिय जिल्हा. मंडई, भागवत सप्ताह, नाट्यप्रयोग असे गावागावांत उत्सव सुरु असताना उन्हाळ्याची चाहूल लागली की गावकऱ्यांना वेध लागतात शंकरपटाचे. ...
शहरासह ग्रामीण भागात चोऱ्या करून पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चौघा सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या चौघांनी १२ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दि ...
अथांग पाणी असलेले गोसे धरण डोळ्याने दिसते. परंतु पाणी मात्र मिळत नाही. सिंचनासाठी विहिरींचाच आधार घ्यावा लागतो. परंतु उन्हाळ्यात विहिरींनीही तळ गाठला. अशा परिस्थितीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पवनी, लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासाठी धरण ...
शिशिराच्या पानगळीत निष्पर्ण झालेल्या वृक्षांना वसंताची चाहूल लागली. आळसावलेला हिवाळा अंगमोडी देऊन टवटवीत उन्हाने सुखावला. तर सकाळ-संध्याकाळ कानात दवाचे डूल घालून थंडीही तोऱ्यात मिरवत आहे. लवकरच रखरखीत उन्हाने घामाच्या धारा निघतील. प्रत्येक जीव कसावीस ...
कोणत्याही अधिकारशाहीचा धाक न दाखवता विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय प्रभावी शिक्षणाची आंतरक्रिया होत नसून विद्यार्थ्यांना धाक दाखवून अबोल करण्यापेक्षा आपुलकीने बोलके करा, असे प्रतिपादन भंडारा पंचायत स ...
लग्न जुळलेल्या पत्नीच्या मैत्रीणीला पाहुणचार करुन गावी पोहोचून देत असताना भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने तरुणीसह दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना येथील वैनगंगा नदी पुलावर मंगळवारी दुपारी २ वाजता घडली. सदर तरुणीचे लग्न १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे ...
निसर्गाने नटलेल्या कोका अभयारण्यात वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अलीकडे धुडगूस घालण्याच्या घटनात वाढ झाली आहे. सोमवारी अशाच पर्यटकांनी व्याघ्र दर्शन झाले नाही म्हणून गोंधळ घालत एका वनमजूराला मारहाण केली. त्यावरुन वनविभागाने त्या पर ...
सर्वत्र आॅनलाईन व्यवहार झाल्याने इंटरनेटची आवश्यकता असते. बहुतांश कार्यालयात शासनाच्या अखत्यारितील भारत संचार निगमची (बीएसएनएल) सेवा आहे. मात्र गत महिन्याभरापासून बीएसएनएलच्या इंटरनेटची गती मंदावल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुणी ...