जिल्ह्यात केवळ दाेन हजार हेक्टरवर धान राेवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:47+5:302021-07-07T04:43:47+5:30
बाॅक्स आठ हजार हेक्टरवर इतर पिके भंडारा जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असले तरी तूर, उडीद, मूग, उस, कापूस, ...

जिल्ह्यात केवळ दाेन हजार हेक्टरवर धान राेवणी
बाॅक्स
आठ हजार हेक्टरवर इतर पिके
भंडारा जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असले तरी तूर, उडीद, मूग, उस, कापूस, भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात कडधान्याचे ११ हजार १७७ हेक्टर क्षेत्र निर्धारित आहे. तेलबिया पिकाचे क्षेत्र ८ हजार ६३२ नगदी, उसाचे क्षेत्र ३,२५९ आणि भाजीपाला पिकाचे ४०० हेक्टर क्षेत्रावर नियाेजन करण्यात आले आहे. आतापर्यंत आठ हजार हेक्टरवर या पिकांची पेरणी झाली आहे. या पिकांनाही आता पाण्याची आवश्यकता आहे.
बाॅक्स
पाऊस बेपत्ता, प्रचंड उकाडा
गत आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहे. धानाच्या बांध्याही काेरड्या झाल्या आहेत. पाऊस कधी काेसळणार याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.