सामाजिक वनीकरणतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन
By Admin | Updated: March 13, 2015 00:48 IST2015-03-13T00:48:30+5:302015-03-13T00:48:30+5:30
सामाजिक वनीकरण विभाग भंडारा अंतर्गत शारदा लॉन भंडारा येथे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा, निबंध व चित्रकला स्पर्धा कार्यक्रम नुकताच पार पडला.

सामाजिक वनीकरणतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन
भंडारा : सामाजिक वनीकरण विभाग भंडारा अंतर्गत शारदा लॉन भंडारा येथे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा, निबंध व चित्रकला स्पर्धा कार्यक्रम नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदमाकर डुंभरे वनश्री पुरस्कृत व्यक्ती प्रमुख अतिथी सहायक संचालक एन.डब्ल्यु. कावळे, कार्तिक मेश्राम, लागवड अधिकारी एस.आर. सार्वे, एम.एस. शेख, मोरे, चौधरी, परीक्षक सुनंदा आंबीलकर, येळणे उपस्थित होते. प्रास्ताविक लागवड अधिकारी एस. आर. सार्वे यांनी केले. पद्माकर डुंभरे यांची अध्यक्षीय भाषणातून पर्यावरणाची पुढची धुरा आजच्या युवकांनी सांभाळावी. पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.
वनश्री पुरस्कार शाहीर कार्तिक मेश्राम यांनी पर्यावरणाची जबाबदारी सर्व मिळून करावी. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन मेश्राम यांनी केले. तसेच चौधरी, मोरे, शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
परिक्षक सुनंदा आंबीलकर यांनी वकृत्व करत असतानी विषयावर भाण ठेवून बोलावे, असे सांगितले. येळणे यांनी वेळेचे व महत्व ठेवूनच सादरीकरण करावे असे सांगितले. नंतर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली यात वृक्ष तोडीला घाला आळा, पर्यावरणाचे रक्षण करा. कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)