सहा धान खरेदी केंद्र बंदचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 05:00 AM2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:01:02+5:30

मोहाडी तालुक्याच्या डोंगरगाव येथील मातोश्री विमलबाई बहुउद्देशिय सुशिक्षित सहकारी संस्थेतर्गत उसर्रा, कांद्री, डोंगरगाव आणि तुमसर येथील पार्वताबाई बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेंतर्गत तुमसर, डोंगरी बुज. आणि मिटेवानी येथील धान खरेदी केंद्रांचा समावेश आहे. उन्हाळी धान खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

Orders to close six grain shopping centers | सहा धान खरेदी केंद्र बंदचे आदेश

सहा धान खरेदी केंद्र बंदचे आदेश

Next
ठळक मुद्देअनियमिततेचा ठपका : तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील केंद्र, मार्केटिंग फेडरेशन सरव्यवस्थापकांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धान खरेदीत अनियमिततेचा ठपका ठेवत मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील सहा धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर आदेश दि महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या सरव्यवस्थापकांनी दिले आहे. सदर केंद्र लगतच्या गावांना जोडण्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मोहाडी तालुक्याच्या डोंगरगाव येथील मातोश्री विमलबाई बहुउद्देशिय सुशिक्षित सहकारी संस्थेतर्गत उसर्रा, कांद्री, डोंगरगाव आणि तुमसर येथील पार्वताबाई बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेंतर्गत तुमसर, डोंगरी बुज. आणि मिटेवानी येथील धान खरेदी केंद्रांचा समावेश आहे. उन्हाळी धान खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. धान केंद्रावरील अनियमिततेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने केली. त्यांनी आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रनिहाय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. संंबंधित केंद्राविरूद्ध शहनिशा करून आवश्यक कारवाई व फौजदारी कारवाई करावी, असेही आदेशीत करण्यात आले होते.
जिल्हाधिकाºयांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संस्थेमध्ये धान खरेदीत अनियमितता झाल्याचे सिद्ध झाले. त्यावरून महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापकांनी विभागीय व्यवस्थापकांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार या सहा केंद्रावरील खरेदी तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या खरेदी केंद्रांतर्गत असणाºया शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी सदर गावे इतर खरेदी केंद्रांना जोडण्याचे स्पष्ट निर्देश या आदेशात देण्यात आले आहे.
या आदेशानंतर जिल्हा पणन अधिकाºयांनी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि संबंधित संस्थेला पत्र पाठविले आहे. यापुढे सदर केंद्रावर उन्हाळी धान खरेदी करू नये, असे स्पष्ट म्हटले आहे.

ग्रेडर अडकला होता एसीबीच्या जाळ्यात
जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या. शेतकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यानंतरही काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून धान मोजणीसाठी पैशाची मागणी होत असल्याचे पुढे आले. कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहून एका शेतकऱ्याने भंडारा लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून कांद्री येथील धान खरेदी केंद्राचा ग्रेडर पैशाची मागणी करीत असल्याचे पुढे आले आणि एसीबीच्या जाळ्यात अडकला. असेच प्रकार जिल्ह्यातील अनेक केंद्रावर पुढे आले. मात्र तक्रार करण्यास कुणी धजावत नाही.

Web Title: Orders to close six grain shopping centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.