शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

"अ‍ॅडव्होकेट्स अ‍ॅक्ट"ला वकिलांचा विरोध

By admin | Updated: April 24, 2017 00:54 IST

अ‍ॅडव्होकेट्स अ‍ॅक्टमधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची शिफारस काहीच दिवसांपूर्वी विधि आयोगाने केंद्र सरकारला केली आहे.

संशोधन विधेयकाची होळी: जिल्हा बार असोसिएशनचा पुढाकारभंडारा : अ‍ॅडव्होकेट्स अ‍ॅक्टमधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची शिफारस काहीच दिवसांपूर्वी विधि आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. मात्र, या शिफारशी वकिली व्यवसायाच्या विरुद्ध असल्याने जिल्हा बार असोसीएशनने शुक्रवारी, येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीच्या बाहेर विधी आयोगचा संशोधन विधेयकाची होळी करण्यात आली.जिल्हा बार असोसीएशनचे पदाधिकारी म्हणाले की, प्रस्तावित दुरुस्त्यांमध्ये अनेक मुद्दे हे वकिली व्यवसायावर अन्यायकारक आहेत. त्यातील महत्त्वाच्या दुरुस्त्यांमध्ये परदेशी वकिलांना देशात वकिली करण्यास परवानगी मिळणार आहे. याउलट भारतीय वकिलांना परदेशात वकिली करण्यासाठी तेथील परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते, मग परदेशी वकिलांना देशात वकिली करण्यासाठी परवानगी देण्याआधी स्थानिक कायद्याची परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणे आवश्यक आहे. शिवाय, याबाबत सर्व स्तरावर चर्चा झालेली नाही. चुकीचे वर्तन केलेल्या वकिलांची चौकशी करून त्यांना योग्य ते शासन करण्याचे अधिकार राज्य विधीज्ञ परिषद व भारतीय विधीज्ञ परिषद यांना आहेत. भारतीय विधीज्ञ परिषदेने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची तरतूद आहे. मात्र, प्रस्तावित तरतुदीनुसार, वकिलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल त्याला दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि पाच लाखांच्या नुकसानभरपाईची तरतूद केली आहे. शिवाय, न्यायालयात जाताना सिग्नल न पाळणे, हेल्मेट न घालणे अशा चुकांसाठीही वकिलीची सनद रद्द करण्याची शिफारस विधि आयोगाने केल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विधेयकाची होळी केल्यानंतर प्रधानमंत्री, कायदामंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. खासदार नाना पटोले यांना निवेदन देण्याचा पदाधिकाऱ्यांनी ठराव घेतला. यावेळी अ‍ॅड. उपाध्यक्ष एस. बी. चव्हाण, सचिव अ‍ॅड. राजन उके, सहसचिव अ‍ॅड. ए. ए. भुजाडे, कोषाध्यक्ष अ‍ॅड. दुष्यंत नखाते, अ‍ॅड. शशिर वंजारी, अ‍ॅड. कैलाश भुरे, अ‍ॅड. राजकुमार उके, अ‍ॅड. योगेंद्र निर्वाण, अ‍ॅड. फुले, अ‍ॅड. यु. ए. तिडके, अ‍ॅड. अजय गभणे, अ‍ॅड. प्रमोद काटेखाये, अ‍ॅड. नितिन बोरकर, अ‍ॅड. एम.जी हरडे, अ‍ॅड. तौसिफ खान, अ‍ॅड. जयेश बोरकर, अ‍ॅड. एस. एस. चौव्हाण, अ‍ॅड. नंदागवळी, अ‍ॅड. बारसागडे, अ‍ॅड. नारनवरेउपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)या शिफारशींना वकिलांचा विरोध...गैरवर्तनाबद्दल चौकशी सुरू असेल, तर अशा चौकशी दरम्यानही वकिलाची सनद निलंबित केली जाईल. राज्य विधीज्ञ परिषदेत निवडून आलेले प्रतिनिधी व त्या प्रांताचे महाअधिवक्ता यांचा समावेश असतो. मात्र विधि आयोगाच्या नव्या शिफारशीमुळे यामध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींसह राज्य शासनाचे अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, समाजातील नामवंत व्यक्ती म्हणजेच व्यवसायाने वकील नसलेल्या व्यक्तींचा समावेश केला जाणार आहे. वकिली म्हणजे "लिगल प्रोफेशन"च्या शब्दात बदल करून आता "लिगल सर्व्हिसेस" असा शब्द सुचविला आहे. तसे झाल्यास वकिलही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येतील. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे वकीलांची सेवा ग्राहक संरक्षण कायद्यात मोडत नाही.