शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: September 25, 2016 00:47 IST

तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखान्याचा वीज दराचा गुंता सुटला असून राज्य शासनाने औद्योगिक वीज ४ रूपये ४० पैसे युनिट दराने देण्याची घोषणा केली.

उद्योगमंत्र्यांची शिष्टाई : राजेंद्र पटले यांच्या प्रयत्नांना यशतुमसर : तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो कारखान्याचा वीज दराचा गुंता सुटला असून राज्य शासनाने औद्योगिक वीज ४ रूपये ४० पैसे युनिट दराने देण्याची घोषणा केली. यामुळे युनिव्हर्सल कारखाना सुरू होण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कंपनीचे संचालक फिरोज नेत्रावाला व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत विदर्भ तथा मराठवाड्यातील आजारी उद्योगांसाठी अत्यल्प वीज दर लागू करण्यात आले आहे.युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना सन २००६ पासून कायम बंद आहे. या कारखान्यावर सुमारे २०० कोटी वीज बिल थकीत होते. अभय योजनेअंतर्गत कंपनी व्यवस्थापनाने ४६ कोटी रूपये भरले होते. शासनाने येथे १२८ कोटी माफ केले. मार्च २०१७ पर्यंत हा कारखाना सुरू करण्याची अट घातली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. राज्य शासनाने २६ टक्के वीज दर कमी केले. राजेंद्र पटले यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी कारखाना सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती. शासनावर दबाव येत असल्याने ४.४० प्रति युनिट सरसकट वीज आकारणी करण्याची घोषणा केली. कंपनी मालक फिरोज नेत्रावाला यांनी १०० टक्के कारखाना सुरू करण्याची हमी दिली. हा कारखाना अ‍ॅक्सीस बँकमध्ये जमिनीसह कंपनी मॉर्गेज केली आहे. कारखाना सुरू करण्याकरिता संबंधित बँकेची परवानगीला यश मिळाले आहे. हा सोपस्कार पार पाडण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला विलंब झाला.येथील कामगारांची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. कामगारांची ही न्याय मागणी रास्त आहे. कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा वकील एस.डी. ठाकूर यांनी कारखाना सुरू करण्याकरीता अडचण नाही, असे राजेंद्र पटले यांना सांगितले. ही बाब कंपनी व्यवस्थापनाने मान्य केली. या बाबींचा विचार करता युनिव्हर्सल कारखाना सुरू करण्याकरिता कोणतीही अडचण नाही. मागील १० वर्षापासून हा कारखाना बंद असल्याने कामगारांचा, क्षेत्राचा बेरोजगारांचा प्रश्न येथे उपस्थित झाला होता. परिसराची प्रगती खुंटली होती. कारखाना परिसर भकास दिसत होते. उच्च दर्जाचे मॅग्नीज शुद्ध करणारा हा युनिव्हर्सल कारखाना सुरू झाल्यावर या परिसराचे महत्त्व पुन्हा वाढणार आहे. (तालुका प्रतिनिधी)