शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ओटीपीच्या फंड्यातून सर्वसामान्यांना एक कोटीचा गंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहे, असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर  तुमचे एटीएम कार्ड बंद होणार, असे सांगून ते  सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत बंद झाली आहे. आता डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत.  गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये फसवणुकीच्या ५० घटना घडल्या होत्या.

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मेहनत न करता पैसे कमाविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक होत असल्याचे प्रकार बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे,  ओटीपीच्या माध्यमातून बँकेतून पैसे गायब होत असल्याचे प्रकार घडत आहेत. यात अनोळखी ॲप डाऊनलोड करताना ‘ऑटो रीड ओटीपी’ परमिशनची परवानगी घेतली जात आहे. यातूनच हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षाकाठी भंडारा जिल्ह्यातून १५ लाख रुपयांनी अशी ऑनलाइन फसवणूक केली जाते. मागील पाच वर्षांत एक कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे.आतापर्यंत एखाद्या बँकेतून बोलत असून किंवा एटीएम ग्राहक सेवा केंद्रातून बोलत आहे, असे सांगून ग्राहकांना कॉल येत होता. त्यानंतर  तुमचे एटीएम कार्ड बंद होणार, असे सांगून ते  सुरू ठेवण्यासाठी ओटीपी विचारून खात्यातून पैसे काढले जायचे. मात्र, आता ही पद्धत बंद झाली आहे. आता डिजिटल युगात सॉफ्टवेअर ॲपच्या माध्यमातून बँकेतून सरळ रक्कम कपात करण्याचे प्रकार घडत आहेत.  गतवर्षी म्हणजे २०२० मध्ये फसवणुकीच्या ५० घटना घडल्या होत्या. त्यापूर्वी २०१९ मध्ये ३५ प्रकरणे,  तर गत दहा महिन्यांत सायबर माध्यमातून फसवणुकीचे गोंदिया जिल्ह्यात  १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच असते.  अनेकदा फसवणूक करणारा इसम अनोळखी नंबरहून व प्रीपेड सीमकार्ड वापरून बोलायचा. दुसऱ्या वेळी तो नंबर लावल्यास तो नंबर ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’ किंवा ‘स्विच ऑफ’ असा दाखवितो.  आताही तीच बाब घडत आहे. त्यामुळे पैसे एकदा गेले की, ते मिळणे कठीण आहे.

अनोळखी ॲप घेऊ नकाn डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बाजारात अनेक ॲप्लिकेशन्स आली आहेत. हेच ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या नादात अनेक ग्राहक ‘सर्व टर्मस् आणि सर्व कंडिशन्स अप्लाय’ करतात. त्यामध्येच ‘ऑटो ओटीपी रीड’ यालासुद्धा परवानगी देऊन टाकतात. अनोळखी ॲप डाऊनलोड केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. परिणामी, आता स्वतः जागरूक होऊन नागरिकांनीच ‘अनोळखी ॲप नको रे बाबा’ अशी बाब म्हणण्यास सुरुवात केली आहे. फसवणुकीचे गुन्हेही अशाच ॲपमधून डेटा चोरी करून घडत आहेत.

महिन्याकाठी तीन-चार गुन्हे

- भंडारा जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी २४ लाख रुपयांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.  महिन्याकाठी तीन- चार गुन्हे घडतच असतात.  जास्त रकमेने अनेकांची फसवणूक झाल्याचेही ऐकिवात आहे; परंतु अनेकदा भीतीपोटी नागरिक समोर येत नाहीत. पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही पोलिसांतर्फे केले जाते. 

टॅग्स :onlineऑनलाइनfraudधोकेबाजी