वृध्द महिलेला ट्रेलरने चिरडले

By Admin | Updated: March 14, 2015 00:54 IST2015-03-14T00:54:07+5:302015-03-14T00:54:07+5:30

रोहयोचे मजुरीचे पैसे काढून जावयासह दुचाकीने लाखनीकडे जाताना ट्रेलरने धडक दिली. यात नादिरा अशोक दिनकर (५०) रा. खुटसावरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

An old woman crushed the trailer | वृध्द महिलेला ट्रेलरने चिरडले

वृध्द महिलेला ट्रेलरने चिरडले

लाखनी : रोहयोचे मजुरीचे पैसे काढून जावयासह दुचाकीने लाखनीकडे जाताना ट्रेलरने धडक दिली. यात नादिरा अशोक दिनकर (५०) रा. खुटसावरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील गडेगाव येथे शुक्रवारी दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास घडली.
खुटसावरी येथील मृतक नादिरा यांना रोजगार हमी योजनेचे पैसे काढायचे असल्याने त्या जावयी रंजीत इसन बोरकर (३०) यांच्या दुचाकी वाहन एमएच ३६ एम ७२९२ ने लाखनी येथे जात होत्या. यावेळी त्यांच्यासोबत वरठी येथील अमित वाघमारे (२७) हा होता. पैसे काढून तिघेही दुचाकीने लाखनीकडे खरेदीसाठी जात होते. यावेळी नागपुरवरुन साकोलीकडे जाणारा ट्रेलर सीजी ०७ सीए ५७२१ ने दुचाकीला मागून धडक दिली. यात नादिरा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात रंजित हा गंभीर जखमी झाला. तर दुचाकी चालक अमित वाघमारे हा किरकोळ जखमी झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
गडेगाव येथे बँक आॅफ महाराष्ट्रमधून रोहयोचे मजुरीचे पैसे काढल्यानंतर तिघेही खरेदीसाठी लाखनीकडे येत असतांना हा अपघात घडला.
यात मृतक महिला नदिरा दिनकर हिचा चेंदामेंदा झाला. ट्रकमध्ये लोखंडी पाईप होते. याप्रकरणी ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार पुरुषोत्तम शेंडे व पोलिस नायक मनोज इळपाते करीत आहे. (तालुका/शहर प्रतिनिधी)

Web Title: An old woman crushed the trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.