शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:11 AM

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांत व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून त्यांना तातडीने व्यसनाधीनतेपासून परावृत्त करा अशा सूचना राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

ठळक मुद्देहाजी अराफत शेख : अल्पसंख्याक समाज योजनांची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांत व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून त्यांना तातडीने व्यसनाधीनतेपासून परावृत्त करा अशा सूचना राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांची संयुक्त समिती स्थापन करून या समस्येवर उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले.महाराष्ट्र राज्य अल्पंसख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी गुरूवारी अल्पसंख्यांक समाजाच्या योजनाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.राज्यातील ३६ जिल्हाचा दौरा नियोजित केला असून भंडारा हा २० वा जिल्हा असल्याचे सांगून हाजी अराफत शेख म्हणाले, भंडारा जिल्हातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध लोकांना भेटून त्यांच्या समस्या ऐकून घेत समाधान केले. अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या शासनाचे योजना गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.भंडारा जिल्ह्यातील समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी विविध समाजाच्या मंडळांची गुरूवारी सकाळी भेट घेतली यामध्ये मुस्लिम समाज, बौद्ध समाज, ख्रिश्चन समाजांचा समावेश होता.ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न गेली पंधरा वर्षे प्रलंबित असून त्यासाठी तातडीने जागेची उपलब्धता व्हावी अशी विनंती प्रतिनिधी मंडळाने त्यांच्याकडे केली होती. त्याबाबत बैठकीत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हजरत शेख यांनी जिल्हाधिकाºयांना सूचना केली. जिल्हाधिकाºयांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.अल्पसंख्यंक समाजाच्या तरुणांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याची शासनाची योजना असून पोलिस विभागाने या बाबत तातडीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या बैठकीत अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमाचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला.नगरपालिकेच्या उर्दु शाळेची इमारत जिर्ण झाली असून नवीन इमारत बांधण्यासाठी ठराव घेतला आहे. इमारतीचे बांधकाम लवकर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाºयांनी बैठकीत दिली. यावर जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची सूचना अराफत शेख यांनी केली.शहरातील उर्दू विद्यालयांना भेटीमौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू हायस्कुल व झाकीर हुसेन उर्दू हायस्कुलला अराफत शेख यांनी भेट दिली. या बैठकीत पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. शिक्षणाच्या संधी वाढविणे, एकात्मिक बाल विकास सेवांची पुरेशी उपलब्धता शालेय शिक्षणाच्या उपलबधतेत सुधारणा करणे, सर्व शिक्षा अभियान, कस्तुरबा गांधी विद्यालय योजना, उर्दू शिक्षणासाठी अधिक संसाधन, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, दंगलीत बळी पडलेल्यांचे पुनर्वसन करणे या योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

टॅग्स :Studentविद्यार्थी