शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

तालुकानिहाय कोरोना बाधीतांच्या संख्येवर नजर घातल्यास भंडारा तालुक्यात ९८२, साकोली १२८, लाखांदूर ६१, तुमसर २०६, मोहाडी २६१, पवनी १६२ तर लाखनी तालुक्यात बाधितांची संख्या २०३ वर पोहोचली आहे. रविवारी आढळलेल्या ११९ रुग्णांपैकी भंडारा तालुक्यात ५६, साकोली १४, लाखांदूर ०१, तुमसर १४, मोहाडी ०१, पवनी १२ तर लाखनी तालुक्यात २१ रुग्ण आढळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. शनिवारी १३८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रविवारी तब्बल ११९ रुग्ण बाधीत आढळली आहेत. परिणामी जिल्ह्यात एकुण बाधीतांची संख्या २००३ वर पोहोचली आहे. तसेच कोरोनाने भंडारा व तुमसर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला आहे. बाधीतांची संख्या सातत्याने वाढत असल्याचेही दिसून येत आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कोरोनबाधितांची संख्या भंडारा तालुक्यात सर्वाधिक आहे. २००३ पैकी ९८२ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यात आहे.

तालुकानिहाय रुग्ण संख्या
तालुकानिहाय कोरोना बाधीतांच्या संख्येवर नजर घातल्यास भंडारा तालुक्यात ९८२, साकोली १२८, लाखांदूर ६१, तुमसर २०६, मोहाडी २६१, पवनी १६२ तर लाखनी तालुक्यात बाधितांची संख्या २०३ वर पोहोचली आहे. रविवारी आढळलेल्या ११९ रुग्णांपैकी भंडारा तालुक्यात ५६, साकोली १४, लाखांदूर ०१, तुमसर १४, मोहाडी ०१, पवनी १२ तर लाखनी तालुक्यात २१ रुग्ण आढळले आहेत.

आतापर्यंत ९७३ जणांना सुटी
जिल्ह्यात एकुण कोरोना बाधीतांची संख्या २००३ झाली आहे. यापैकी ९७३ पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी परतले आहेत. रविवारी ३६ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत आयसोलेशन वॉर्डातून १४२४ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. या वॉर्डात आता १४४ व्यक्ती भरती आहेत. जिल्ह्यात अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीटद्वारे १३६०६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये आतापर्यंत १३२१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले.

लोक हो असे का वागता...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात भंडारा तालुका आघाडीवर आहे. आजाराला घाबरण्याचे कारण नाही. मात्र खबरदारीचा उपाय करताना नागरिक तोकडे पडत असल्याचे दृष्टीक्षेपात येत आहे. एकट्या भंडारा शहरात रुग्णसंख्या तीन आकड्यांच्या घरात पोहोचलेली असताना लोक हो असे का वागता अशी म्हणायची वेळ आली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या