आता कृषी विक्रेत्यांना असणार शिक्षणाची अट

By Admin | Updated: January 10, 2016 00:41 IST2016-01-10T00:41:11+5:302016-01-10T00:41:11+5:30

कृषी विक्रेत्यांना दोन वर्षाच्या आत कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Now the condition of education for agriculture vendors | आता कृषी विक्रेत्यांना असणार शिक्षणाची अट

आता कृषी विक्रेत्यांना असणार शिक्षणाची अट

खळबळ : पदवीधारकांना मिळणार परवाना
खराशी : कृषी विक्रेत्यांना दोन वर्षाच्या आत कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शिक्षणाच्या अधिसूचनेमुळे पदवीशिवाय कृषी केंद्र चालविणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.
अनेक कृषी केंद्रचालकांचा या निर्णयावर रोष असला तरी शेतकऱ्यांना योग्य सेवा मिळावी यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे कृषी विभागाचे मत आहे. किटकनाशके, खाद्यान्नाच्या सेवा देणाऱ्या कृषी विक्रेत्यांना शैक्षणिक अट अनिवार्य करण्याची अधिसूचना शासनाने जारी केली आहे.
ही अधिसूचना जारी झाल्यापासून दोन वर्षाच्या आत बीएससी कृषीची पदवी प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आल आहे. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नव्या विक्रेत्यांना आले आहे.
परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या नव्या विक्रेत्यांना पदवीधर कर्मचारी नियुक्त करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. जुन्या परवानाधारकांना स्वत: पदवी मिळविणे बंधनकारक आहे. राज्यात १ लाख ३८ हजार कृषी सेवा केंद्र आहेत. यामध्ये काही पदवीधर तर काही अन्य शैक्षणिक पात्रतेचे आहेत. (वार्ताहर)

Web Title: Now the condition of education for agriculture vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.