तलाठी नाही; दाखल्यासाठी फरफट

By Admin | Updated: July 19, 2014 00:49 IST2014-07-19T00:49:02+5:302014-07-19T00:49:02+5:30

महसूल प्रशासन कार्यक्षम तथा अपडेट करण्याकरिता

Not Talathi; Fashion for the certificate | तलाठी नाही; दाखल्यासाठी फरफट

तलाठी नाही; दाखल्यासाठी फरफट

तुमसर : महसूल प्रशासन कार्यक्षम तथा अपडेट करण्याकरिता तहसील कार्यालयात आॅनलाईन प्रक्रिया करणे सध्या सुरू आहे. मागील २० जूनपासून तालुक्यातील तलाठ्यांनी आपल्या कार्यक्षेत्राला दांडी मारली आहे. सामान्य नागरिकांची अनेक कामे दाखल्याअभावी रखडली आहेत. महसूल प्रशासनाचे नियोजन येथे चुकल्याचे दिसून येते.
९७ ग्रामपंचायती अंतर्गत १३६ गावे व एक नगरपरिषद असलेल्या तुमसर तालुक्यातील शासनाने येथे केवळ ३२ तलाठ्यांची मंजूर पदे आहेत. सध्या येथे केवळ २९ तलाठी कार्यरत आहेत. अडीच लाख लोकसंख्येकरिता केवळ १९ तलाठी आहेत. मागील २० जूनपासून तहसील कार्यालयात आॅन लाईन प्रक्रिया सुरू आहे. याकरिता तालुक्यातील तलाठी तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते ४.३० पर्यंत उपस्थित राहत आहेत. २० जूनपासून अनेक तलाठी गावाकडील कार्यक्षेत्रात फिरकले नाहीत. तहसील कार्यालयात कामे आहेत, अशी बतावणी सध्या त्यांच्या कार्यक्षेत्रात सांगितली आहेत. सध्या शैक्षणिक संस्था व इतर कार्यालयात तलाठ्यांचे दस्ताऐवज प्रत्येकालाच घेणे बंधनकारक आहे. या दस्ताऐवजामुळे सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत.
शासन दरबारी तलाठी मुख्यालयी राहतात, अशी माहिती आहे. परंतु वास्तविक तलाठी आपल्या कार्यक्षेत्रात राहत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तहसील कार्यालयातील कामे आटोपून ते आपल्या कार्यक्षेत्रात जातात व उर्वरित कामे करतात, असे गृहीत प्रशासन धरत आहे. परंतु केवळ कागदोपत्री त्यांची उपस्थिती आहे.
नियोजनाचा अभाव
तहसील कार्यालयात तलाठ्यांचे उपस्थिती दुपारनंतर ठेवण्याची गरज आहे. सकाळी ९ ते १२ आपल्या कार्यक्षेत्रात व त्यानंतर तहसील कार्यालयात येणे, असा आदेश तहसीलदारांनी देण्याची गरज आहे.
कारवाई सुरू
तलाठी आपल्या कार्यक्षेत्रात नसल्याच्या तक्रारीवर तहसीलदार सचिन यादव यांनी कार्यक्षेत्रात न जाणाऱ्या व कामे रखडलेल्या तलाठ्यांवर कारवाईचे संकेत दिले. या प्रकरणाचा आढावा घेण्यात येईल, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Not Talathi; Fashion for the certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.