शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राज्यमार्ग नव्हे हे तर मृत्यूचे प्रवेशद्वारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 5:00 AM

जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टी आणि महापुरानंतर अनेक रस्ते वाहून गेले. त्याचा फटका भंडारा ते वरठी या राज्य मार्गाला बसला आहे. वरठी येथे रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तसेच मध्यप्रदेशकडे जाणाराही हाच प्रमुख मार्ग आहे. परंतु अलिकडे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे लोट उडतात.

ठळक मुद्देरस्त्याची चाळण : भंडारा ते वरठी प्रवास नको रे बाबा, राष्ट्रीय महामार्गावरही खड्डेच खड्डे

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराला रेल्वे मार्गाने जोडणारा १५ किलोमीटरचा भंडारा ते वरठी रस्ता ठिकठिकाणी उखडला असून राज्य मार्ग नव्हे तर मृत्यूचे प्रवेशद्वार म्हणावे इतपत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरून जाणारा प्रत्येक जण वरठी मार्गावर प्रवास नको रे बाबा असे म्हणत आहे.जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टी आणि महापुरानंतर अनेक रस्ते वाहून गेले. त्याचा फटका भंडारा ते वरठी या राज्य मार्गाला बसला आहे. वरठी येथे रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तसेच मध्यप्रदेशकडे जाणाराही हाच प्रमुख मार्ग आहे. परंतु अलिकडे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे लोट उडतात. वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर उखडलेल्या खड्ड्यातील दगड चाकांमधून उसळून दुसऱ्या वाहनचालकांना लागण्याच्या घटना घडत आहेत. लहान सहान अपघात तर नित्याचीच बाब आहे. गत आठवड्यात एका तरुणाला नाहक जीव या खड्ड्यांमुळे गमवावा लागला होता. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.या मार्गावरून शेकडो चारचाकी, दुचाकी वाहने धावतात. रस्ता उखडलेला असला तरी रेतीचे ट्रक आणि ट्रॅक्टरही भरधाव धावताना दिसून येतात. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी गत काही महिन्यांपासून नागरिक करीत आहेत. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकाच्या अंगावर काटा उभा राहत असून अनेकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडले आहेत.महामार्गावर अनधिकृत पार्कींगराष्ट्रीय महामार्गावरील मुजबी फाटा आणि ठाणा, खरबी नाका या ठिकाणी वाहनांची अनधिकृत पार्कींग केली जाते. ट्रकच्या लांबच लांब रांगा येथे लागलेल्या असतात. आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर खड्डेही पडले आहेत. त्यातच वाहने उभे राहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. खरेदीदार रस्त्यावरच वाहन उभे करून खरेदी करतात. त्यामुळे अनेकदा येथे वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलीस शिपाई उपस्थित राहत असले तरी या वाहनचालकांवर मात्र कोणतीच कारवाई केली जात नाही.

टॅग्स :highwayमहामार्गstate transportएसटी