No sand was found for construction | बांधकामासाठी रेती मिळेना
बांधकामासाठी रेती मिळेना

ठळक मुद्देभावही वधारले : चोरी छुप्या मार्गाने रेतीची वाहतूक सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एकीकडे जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. परिणामी इमारत बांधकामासह रस्ते व नाली बांधकामासाठी रेती मिळणे अवघड झाले आहे. दुसरीकडे ज्यांनी रेतीचा स्टॉक करून ठेवला आहे त्यांनी रेतीचे भाव वाढवून रेतीची चोरी छुप्या मार्गाने विक्री करीत आहेत.
जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. तरीही काही घाटांवर रेती तस्करांची खुलेआम मुजोरी दिसून येत आहे. याचा सर्वाधिक प्रभाव पवनी, तुमसर व मोहाडी तालुक्यात दिसून येत आहे.
खाजगी घर बांधकाम करणाऱ्यांना रेतीचा पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे बांधकाम अडचणीत सापडले आहेत. अशीच अवस्था योजनेंतर्गत बांधून देण्यात येणाºया घरकुलांचीही स्थिती आहे. मात्र ज्यांचे अधिकाºयांशी साटेलोटे आहे अशांचे मात्र चांगलेच फावले आहे. दुसरीकडे चोरी छुप्या मार्गाने रेतीची वाहतूक करणाºया पेटी कंत्राटदारांची दमछाक होत आहे.
रेतीची अवैध वाहतूक करताना पकडल्यास दंडाची रक्कम अधिक असल्याने ती आपल्याला भरून द्यावी लागणार, या भितीपोटी रेतीची वाहतूक सुरू आहे. १८०० ते दोन हजार रूपयापर्यंत प्रती ट्रॅक्टर उपलब्ध होणारी रेतीचे भाव आजघडीला अडीच ते तीन हजारापर्यंत पोहचले आहे. घर बांधकाम करणाºयांची ही एकप्रकारे सर्रास लुट आहे. यावर मात्र महसूल प्रशासन हतबल दिसून येत आहे. घरमालकही बांधकाम थांबेल या भीतीपोटी महागड्या रेतीची खरेदी करीत आहे. प्रशासनाची कारवाई होत असली तरी काही अधिकाºयांच्या वरदहस्ताने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.

पहाटेपासून सुरू होतो गोरखधंदा
रेतीची अवैध वाहतूक सुरू करण्याचा गोरखधंदा पहाटेपासूनच सुरू होतो. आधीच अवैध वाहतूकसह ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांचे हाल झाले असताना अपघातांचीही संख्या वाढली आहे. गुरूवारी ओव्हरलोड वाहतुकीचा फटका एका ११ वर्षीय बालकाला बसला. अज्ञात ट्रेलरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भंडारा-वरठी राज्य मार्गावर घडली. याच मार्गावर रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. पहाटेपासूनच ही वाहतूक सुरू होत असून जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही अशीच स्थिती आहे.

Web Title: No sand was found for construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.