शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे खापाप्रकरणी कुणालाही अटक नाही

By admin | Updated: September 5, 2016 00:37 IST

उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी खापाकांड घडले. त्यात निरअपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकले.

नाना पटोलेंचे आश्वासन : ‘ती’ कलम गुन्ह्यातून मागे घेणारतुमसर : उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी खापाकांड घडले. त्यात निरअपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकले. अन्य लोकांनाही अटक होणार असल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली आले आहेत. पंरतू यापूढे कुणालाही अटक होता कामा नये. म्हणून उच्चस्तरीय बोलणी झाली असून नागरिकांवर लावलेल्या गुन्ह्यातून भांदविची कलम ३३३ चा गुनहा पोलीस प्रशासन मागे घेत आहे. त्यामुळे अटकेत असलेल्या ११ जणांना मिळून ते लवकर स्वगृही परतणार असल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली. येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे २९ आॅगस्टला गर्भवती जयश्री राजेश ठवकर या महिलेचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करुन प्रतिउत्तर दिले होते. त्या प्रकरणी खापा येथील नागरिकांवर गुन्हे दाखल केले. ११ जणांना तुरुंगात डांबले. ही बाब खा. नाना पटोले यांना समजताच त्यांनी प्रकरणाची संपुर्ण चौकशी केली. विनाकारण त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. लाठीमार करण्याची उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदंड यांनी तालुका दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्याचबरोबर कलम ६९ अन्वये आंदोलकांना अटक करता आली असती, पंरतु एसडीपीओंनी लाठीमार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे केली आहे. नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम जेव्हा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांची दिशाभूल केली, असेही सांगण्यात आले. (शहर प्रतिनिधी)काय आहे भांदविची कलम ३३३ ?या कलमाअंतर्गत लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत पोहचविणे होय. यात १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड असे शिक्षेचा प्रावधान असून आजामीन पात्र गुन्हा आहे. सत्र न्यायालयातून सदर प्रकरण चालविले जाते.