शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचा उल्लेख नाही ! जातनिहाय जनगणनेबाबत वाढली संभ्रमावस्था; राजपत्रात ओबीसींचा उल्लेखच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 18:54 IST

Bhandara : केंद्र सरकारने देशभरात अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) तसेच इतर मागासवर्गीय (OBC) समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारने देशभरात अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) तसेच इतर मागासवर्गीय (OBC) समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जनगणना राजपत्रात ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त होत असून ओबीसी संघटनांकडून स्पष्टीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे.

२२ जानेवारी रोजी केंद्र सरकारकडून जनगणनेसंदर्भातील ३३ सूची राजपत्रात जाहीर करण्यात आल्या. या सूचीत घर क्रमांक, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग, कुटुंब सदस्यसंख्या, घराची स्थिती, पाणी व वीज उपलब्धता, शौचालय, टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप, मोबाइल, वाहन आदी विविध सामाजिक व आर्थिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, १२ व्या क्रमांकावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा स्पष्ट उल्लेख असताना ओबीसींसाठी स्वतंत्र नोंद आढळून येत नाही. ओबीसी समाजात अस्वस्थता वाढली आहे.

मंत्रिमंडळात झाला होता जातनिहाय जनगणनेचा निर्णय

देशाच्या विकास प्रक्रियेत विविध समाजघटकांचे योगदान आणि त्यांची लोकसंख्या अचूकपणे समोर यावी, यासाठी जातनिहाय जनगणनेची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत होती. या पार्श्वभूमीवर ३० मे २०२५ रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ऑक्टोबर २०२६ पासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड येथे, तर उर्वरित देशात मार्च २०२७ पासून जनगणना सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले होते.

स्पष्टीकरण देत संभ्रम दूर करण्याची अपेक्षा

आगामी जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र रकान्यात नोंद होणार किंवा नाही, यापूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर अंमलबजावणी होणार किंवा नाही. ओबीसींना दिलेले आश्वासन पाळले जाणार की नाही, या प्रकरणी केंद्र शासनाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पाळावे

केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पाळून जातनिहाय जनगणनेत ओबीसींचा स्पष्ट समावेश करावा व समाजाचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, सहसचिव शरद वानखेडे, कोषाध्यक्ष गुनेश्वर आरीकर, राष्ट्रीय महिला ओबीसी महासंघाच्या अध्यक्ष सुषमा भड, राष्ट्रीय युवा महासंघाचे अध्यक्ष सुभाष घाटे, महिला प्रदेशाध्यक्षा ज्योती ढाकणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. मुकेश पुडके यांनी केली आहे.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीMaharashtraमहाराष्ट्र