शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या सहकार्याशिवाय राज्यात सरकार बनणारच नाही : बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 11:04 IST

Amravati : प्रीती बंड यांच्या प्रचारासाठी बडनेऱ्यात उत्स्फूर्त गर्दीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क बडनेरा : मुद्द्यांपासून दूर ठेवण्याचे काम कोणी करत असेल, तर त्याला धडा शिकवा. आपल्याला व्यवस्था बदलण्याची गरज आहे. ही लढाई जिंकायची आहे. आमच्याशिवाय सरकार बनणारच नाही, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त करताच गर्दीतून एकच उत्स्फूर्त जल्लोष उमटला. बडनेरात त्यांची अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांच्या प्रचारासाठी सभा झाली.

बडनेरा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांच्याकरिता रविवारी सायंकाळी ७ वाजता आठवडी बाजार परिसरातील मैदानावर बच्चू कडू यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला मोठी गर्दी जमली होती. तुमच्याशिवाय प्रीती बंड या एक पाऊलदेखील समोर टाकणार नाहीत, हा मला विश्वास आहे. ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे, गर्दीवर जाऊ नका, आपल्या हाती केवळ दोन दिवस उरले आहेत. प्रीती बंड यांच्या विजयाची वाट तुमच्या हाती आहे. 'अभी कोई हमारी जीत रोक नही सकता', असे बच्चू कडू आपल्या भाषणात म्हणाले. सभेला ज्ञानेश्वर धाने पाटील, दिनेश बूब, नाना नागमोते, जितू दुधाने, राजू वानखडे, आशिष धर्माळे, प्रकाश बनसोड, अयूब खान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. विविध संघटनांनी प्रीती बंड यांना याठिकाणी पाठिंब्याचे पत्र दिले. एवढी गर्दी पाहून मी भारावले आहे. अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी एवढे लोक असताना कोण म्हणेल, मी एकटी आहे?, ही लढाई आता माझ्या एकटीची नसून, आपल्या सर्वांची झाली आहे. आपण मला बळ द्यावे, असे प्रीती बंड याप्रसंगी म्हणाल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४AmravatiअमरावतीBachhu Kaduबच्चू कडू