शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

भंडारा शहरात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांची चोरी

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: April 23, 2024 11:24 AM

Bhandara News: सोमवारी 22 एप्रिल च्या मध्यरात्री भंडारा शहरातील नऊ दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले. दुकानांचे शटर वाकवून शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या नऊ दुकानांमध्ये चोरी करण्यात आली.

- गोपाल कृष्ण मांडवकर  भंडारा - सोमवारी 22 एप्रिल च्या मध्यरात्री भंडारा शहरातील नऊ दुकानांना चोरट्यांनी लक्ष केले. दुकानांचे शटर वाकवून शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या नऊ दुकानांमध्ये चोरी करण्यात आली. यात एका  ज्वेलर्सही समावेश असून सर्व ठिकाणचा चोरीस गेलेला एकूण मुद्देमाल जवळपास  पाच लाखांच्या घरात आहे.

दीड ते अडीच वाजताच्या दरम्यान हे सर्व प्रकार घडले. जिल्हा परिषद चौकातील आनंदा किराणा स्टोअर्स, मेडिक्यूअर फार्मसी, पंचशील चौकातील मेन्स वेअर, गायत्री स्वदेशी, हेडगेवार चौकातील पंचशील किराणा स्टोअर्स, गणेश ज्वेलर्स आणि राजीव गांधी चौकातील बिकानेर स्वीट मार्ट या नऊ ठिकाणी  चोरीचे प्रकार घडले. चोरट्यांनी सर्वच ठिकाणी एकाच पद्धतीने शटर वाकवून दुकानात प्रवेश केल्याचे दिसत आहे. काही दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोर येताना आणि चोरी करताना दिसत आहेत. यावरून हे सर्व कृत्य एकाच टोळीचे असावे असा अंदाज व्यक्त होत  आहे.  आठ जणांची टोळी चोरी करणारी ही टोळी युवकांच्या असून त्यात आठ व्यक्ती असल्याचे दिसत आहेत. एका दुकानात दोन मोपेड वरून येऊन प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.  गस्तीवर प्रश्नचिन्ह हे सर्व प्रकार रात्री दीड ते अडीच वाजताच्या सुमारास घडले. चोरी झालेली सर्व दुकाने मुख्य मार्गावर आहेत. त्यामुळे आता पोलिसांच्या गस्तीपथावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नऊ ठिकाणी चोरीचे प्रकार घडूनही पोलिसांच्या निदर्शनास ही बाब कशी आली नाही, असा प्रश्न आता नागरिकांनी व्यापारी विचारत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी