उजवा कालव्यात पडून निलगाईचा मृत्यू

By Admin | Updated: February 27, 2015 00:28 IST2015-02-27T00:28:34+5:302015-02-27T00:28:34+5:30

तहानलेली निलगाय पाण्याच्या शोधार्थ शहरालगत असलेल्या उजव्या कालव्यात आली असता तिचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

Nilgai's death by falling into the right canal | उजवा कालव्यात पडून निलगाईचा मृत्यू

उजवा कालव्यात पडून निलगाईचा मृत्यू

पवनी : तहानलेली निलगाय पाण्याच्या शोधार्थ शहरालगत असलेल्या उजव्या कालव्यात आली असता तिचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
पवनी शहराला उमरेड- कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प लागून आहे. या परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचालीत वाढ झाली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. आज दुपारी १ वाजताच्या सुमारास निलगाय पाण्याचा स्त्रोत शोधत शेषनगर येथून मुख्य रस्त्यावर आली. वाहनांच्या आवाजाने तिने जंगलाकडे पळ काढला. उजव्या कालव्यात ती बुडाली. घटनेची माहिती पोलिस व वनविभागाला होताच त्यांनी घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांचा सहकार्याने पाऊण तासानंतर कालव्याबाहेर काढण्यात आले. पशुवैद्यकिय डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषीत केले. (तालुक/शहर प्रतिनिधी)

Web Title: Nilgai's death by falling into the right canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.