साकोली : शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च करीत असते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले व्हावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे. परंतू ग्रामीण भागातील जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे जलजन्य आजार पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे, पाणीपुरवठा विभागाकडे असते. मात्र ग्रामपंचयत व पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक गावात जलशुद्धीकरण यंत्रच बसविण्यात आले नाही.
त्यामुळे नागरिकांना दुक्षित पाणी प्यावे लागते. ग्रामपंचायत ही गावाची प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते. ग्राम पंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याची कामेही केली जातात. त्यामुळे गावकऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही याची खबरदारी ग्रामपंचायतीने घेणे आवश्यक आहे.
जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने बऱ्याच गावातील नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. दुषित पाण्यामुळे जलजन्य आजाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. बऱ्याच ठिकाणी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो.
अशा परिस्थितीत टाकीमध्ये येणारे पाणी शुद्ध करूनच नागरिकांना पुरविणे अवश्यक आहे. सद्यस्थितीत पावसाअभावी पाण्याच्या पातळीत घर झाली आहे. त्यामुळे विहिमध्ये दूषित पाणी येत असते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा हा शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण भागातील जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष
By admin | Updated: July 16, 2014 00:01 IST
शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च करीत असते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले व्हावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}