पवनीतील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित
By Admin | Updated: July 26, 2016 00:50 IST2016-07-26T00:50:55+5:302016-07-26T00:50:55+5:30
ऐतिहासीक वारसा लाभलेल्या पवनी नगरात शेकडो मंदीर, वैनगंगा नदीवरील घाट, परकोट, गरूडखांब व उत्खननात सापडलेले ...

पवनीतील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित
दिवाणघाट ढासळणार : घाट दुरूस्तीसाठी नगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीनी शासनाकडे प्रयत्न करण्याची गरज
अशोक पारधी पवनी
ऐतिहासीक वारसा लाभलेल्या पवनी नगरात शेकडो मंदीर, वैनगंगा नदीवरील घाट, परकोट, गरूडखांब व उत्खननात सापडलेले भव्य स्तुप अशा कित्येक वास्तू पुरातत्व विभागाने जतन करून देखभाल करावी, अशा आहेत. त्यापैकी एक असलेला प्रसिद्ध दिवाणघाट आहे. प्रशासनाकडून दुर्लक्षित असल्याने ढासळण्याचे स्थितीत आलेला आहे.
वैनगंगा नदीवरील घाटामुळे नगराचे सौंदर्यात भर पडलेली आहे. संपूर्ण विदर्भात पवनीनंतर आंभोरा व मार्कंडा या ठिकाणी वैनगंगा नदीवर घाट बांधलेले आहेत. घाटाचे बांधकाम करण्यात आल्याने पर्यटक सहजरित्या नदीपात्रापर्यंत पोहचू शकतात. स्रान व उर्वरित धार्मिक कार्य करण्यासाठी सोयीचे आहे. परंतू घाट ढासळले तर कोणतेही सरकार नव्याने नदीवर घाट बांधकाम नाही. त्यामुळे ऐतिहासीक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग, बांधकाम विभाग किंवा लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकास निधी खर्च करून घाटांची दुरूस्ती करण्यात यावी, नगराचे उत्तरेला वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर दिवाणघाट, पानखिडकी घाट, वैजेश्वर घाट व ताराबाईचा घाट आहे. त्यापैकी आतापर्यंत लक्षावधी रूपयांचा निधी खर्च करून वैजेश्वर घाट सुस्थितीत ठेवण्याचा पर्यटन करण्यात आलेला आहे. पवित्र असे वैजेश्वराचे मंदीर, स्मशानघाट असल्याने स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्या स्थळासाठी पर्यटन विकास निधी तसेच स्थानिक विकास निधी खर्च केलेला आहे. दिवानघाट सुद्धा फारपूर्वी पवनीकरांचे आकर्षण होते. नगरातील सर्व नागरिक स्रानासाठी दिवाणघाटावर जात असत. सकाळी घाटावर वर्दळ असायची. अलीकडे घाट ढासळण्याचे स्थितीत असल्याने भितीपोटी नागरिकांचे जाणे बंद झाले आहे. दिवानघाटाचे सौंदर्य अद्यापही पर्यटकांना आकर्षित करणार आहे. ढासळलेले बुरूज व ढासळू पाहणारे घाट दुरूस्तीसाठी नगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीनी शासनाकडे प्रयत्न करावे, असे जनतेला वाटत आहे. आमदार अॅड. रामचंद्र अवसरे पवनीवासीय असल्याने स्थानिक पातळीवरील समस्या मागणीशिवाय सुटाव्यात, अशी मागणी आहे.