शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे संगोपन करण्याची गरज

By admin | Updated: February 10, 2016 00:39 IST

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालन करणे गरजेचे आले. पशुपालनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते.

नरेश डहारे यांचे प्रतिपादन : आजगाव येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीपालोरा : शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालन करणे गरजेचे आले. पशुपालनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते. मात्र सध्याला पाण्यापेक्षाही दुधाला अल्पभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना बालगोपालांना जनावरांचे पालनपोषण करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जनावरांचे वैरण शेतात पेरून जनावरांचे पालन व संगोपन करावे असे जिल्हा परिषदेचे नरेश डहारे यांनी प्रतिपादन आजगाव येथील तालुकास्तरीय पशु प्रदर्शनी कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले पवनी पशुवैद्यकीय कार्यालय अंतर्गत आजगाव येथील मार्कड स्टेडीयम येथे एक दिवसीय तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पशुपक्षाचे उत्कृष्ट प्रकारे संगोपन करण्यासाठी या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी व उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या पशुपालकांना बक्षिस वितरणाकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत पशुपक्ष्यांचे १० गट पाडण्यात आले होते. यात प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसांचे पाहुण्यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या प्रसंगी सभापती नरेश डहारे मह्णाले, ज्या प्रमाणे दुधाचे भाव कमी प्रमाणात आले. या दुधावर अनेक उद्योगपती कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करीत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जनावरांच्या खाद्याचे भाव गगनात भिडले आहे. मात्र दुधाला पाण्याचे भाव आले ही एक शोकांतिका आहे. पशुपालनाकरिता बालगोपालांसाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांनी व बालगोपानी घ्यावा व आपला आर्थिक विकास साधावा. कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती सभापती अर्चना वैद्य या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सभापती नरेश डहारे हे होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, खंड विकास अधिकारी पवनी एस.के. भगत, आजगाव येथील सरपंच राजेश भेंडारकर, पंचायत समिती सदस्य मंगेश ब्राह्मणकर, दुग्ध सह. संस्था आजगावचे सदस्य विनायक कोरे, क्रिष्णा साकरकर, व आदी पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी २८ पशुपक्षी पालकांना उत्कृष्ट बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक़माचे प्रास्ताविक पशु विकास वैद्यकीय अधिकारी ए.जी. ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.रेहपाडे यांनी तर आभार डॉ.जी.के. गभने यांनी मानले. (वार्ताहर)