डेंग्यूला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधक उपायाची गरज
By Admin | Updated: September 13, 2014 23:40 IST2014-09-13T23:40:41+5:302014-09-13T23:40:41+5:30
डेंग्यू हा आजार पहिल्यांदा चीती जीत राजवंशात आढळला. १७ व्या शतकात डेंग्यूची साथ आली होती. आशिया, आफ्रिका व उत्तर अमेरिका खंडात डेंग्यूमुळे जीवित हानी झाली होती. अशा या जीवघेण्या आजाराला

डेंग्यूला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधक उपायाची गरज
मोहाडी : डेंग्यू हा आजार पहिल्यांदा चीती जीत राजवंशात आढळला. १७ व्या शतकात डेंग्यूची साथ आली होती. आशिया, आफ्रिका व उत्तर अमेरिका खंडात डेंग्यूमुळे जीवित हानी झाली होती. अशा या जीवघेण्या आजाराला दूर ठेवण्यासाठी गावागावांत जनजागृती झाली पाहिजे. डेंग्यू रोगाच्या संबंधी ग्रामीण व शहरी भागात कमी जागृतीमुळे डेंग्यू आजाराचा उद्रेक झाला आहे. हा उद्रेक थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती व तेवढीच प्रतिबंधक उपायाची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी येथे डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक आर.वाय. बांते बोलत होते. कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य बेटाळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्षशेट्टीवार, सरपंच राजेश लेंढे, सहायक शिक्षक धनराज वैद्य, गजानन वैद्य, शोभा कोचे, आरोग्य सहायक चोपकर, कारेमोरे, सुखदेवे, शिंदे, बंसोड, वर्षा ढोमणे यांची उपस्थिती होती.
यावेळी सकाळी जिल्हा परीषद केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा, महात्मा जोतिबा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. केंद्रीय शाळेने गटागटाने घरांना भेटी देवून डास व अळीची पाहणी केली. महात्मा जोतिबा फुले हायस्कूलच्या प्रांगणात डेंग्यू आजार कसा होतो, याविषयी कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी डॉ. लक्षशेट्टीवार, विज्ञान शिक्षक शोभा कोचे, डी.एम. वैद्य यांनी डेंग्यू तापाचे लक्षणे, डेंग्यू आजाराचा प्रसार व त्याच्यावर प्रतिबंधक उपाय काय केले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्र बेटाळाच्या वतीने घरांचे सर्वेक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन हेमराज राऊत यांनी तर आभार प्रदर्शन हंसराज भडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)