शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देगुरुप्रसाद पाखमोडे : जिल्हा ग्रंथालय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे मराठी राजभाषा दिनाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बोलीभाषेच्या विकासाने प्रमाणभाषा समृद्ध होत असते. मराठी भाषा ही अनेक बोलीभाषांची भाषिक कौशल्य असलेली समृद्ध भाषा होय. अलीकडच्या काळात इंग्रजीच्या अतिवापराने मराठी भाषेवर इंग्रजीचा प्रभाव जाणवत आहे. इंग्रजी ही जागतिक व्यवहाराची भाषा म्हणून अपरिहार्य असली तरी मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी केले.वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जयश्री सातोकर, कवी प्रमोद अणेराव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते.मराठी भाषेला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहचले आहे. अशावेळी मराठी भाषेला उतरती कळा लागली असे म्हणणे संयुक्तीक होणार नाही. मात्र जागतिक संगणकीय भाषा असलेल्या इंग्रजीच्या अतिवापराने तसेच मराठी बोलण्याच्या संकोचाने मराठीचा वापर कमी होताना दिसत आहे. दोन मराठी व्यक्ती आपसात इंग्रजी किंवा हिंदीतून संभाषण करतात, अशावेळी हा धोका अधिक संभवतो. भाषेच्या कक्षा विस्तारताना आपली भाषेची समज व ज्ञान वृद्धींगत करणे आवश्यक असल्याचे मत पाखमोडे यांनी व्यक्त केले.भाषेचा इतिहास व संस्कृती विशद करताना प्रमोद अणेराव यांनी अनेक संदर्भ दिले. बारा मैलावर बोली बदलत असली तरी भाषा ही कायम असते. भाषेचा गोडवा प्रत्येकांनी जोपासण्याची गरज मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी मार्गदर्शन केले. संचालन संजय नारनवरे यांनी केले.संत साहित्याने मराठी समृद्धमराठी भाषा ही जनसामान्यांची भाषा असून संत साहित्याने मराठीला समृद्ध करण्याचे काम पूर्वापार केले, असे प्रा.डॉ.जयश्री सातोकर यांनी सांगितले. मराठी भाषा ही मुळातच अभिजात भाषा असून मराठीला शेकडो वर्षाचा इतिहास असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले. संत साहित्यातून सुद्धा बोलीभाषेचा गोडवा आपणास पहावयास मिळतो. बोलीभाषा व व्यवहार्य भाषा वेगळ्या असल्या तरी त्याचा एकच उगम असतो. बोलीभाषेतील साहित्य मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्याचे डॉ.सातोकर यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठी