शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:32 IST

जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जनसामान्यांच्या मागण्यांसाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देनिवेदन : मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जनसामान्यांच्या मागण्यांसाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मधुकर कुकडे, प्रदेश प्रतिनिधी धनंजय दलाल, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या नेतृत्वात हा हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मागील तीन वर्षापासून सत्तेतील भाजप सरकार सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केला.शेतकरी, शेतमजूर कामगार, लहान व्यवसायीक यांच्यात सरकारप्रती असंतोष असून नोटबंदी व जीएसटीचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. हल्लाबोल आंदोलनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या आंदोलनात विजय डेकाटे, नरेंद्र झंझाड, नितीन तुमाने, तोमेश्वर पंचभाई, डॉ.जगदीश निंबार्ते, अविनाश ब्राम्हणकर, विठ्ठलराव कहालकर, शैलेश मयूर, राजकुमार माटे, वासुदेव बांते, अंगराज समरीत, धनू व्यास, देवचंद ठाकरे, महेंद्र गडकरी, उर्मिला आगाशे, रेखा ठाकरे, जि.प. सदस्य उत्तम कळपाते, विवेकानंद कुर्झेकर, गीता माटे, प्रेरणा तुरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनकर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, धानाला खोडकिडा व करपा लागल्याने शेतकºयांचे नुकसान झाले असून प्रतिहेक्टर २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या तथा फवारणीमुळे बळी पडलेल्या कुटुंबियांना १० लाखांची आर्थिक मदत देऊन मुलामुलींच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था करावी, मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर जाहीर हमीभाव द्यावा, दुग्ध व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे गाईच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ५० रुपये खरेदीदर द्यावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, नुकसानग्रस्त शेतीचा सर्वे करून पीकविम्याचा मोबदला द्यावा यासह असंख्य मागण्यांना घेऊन हा हल्लाबोल आंदोलन केले.