शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

नेरी ग्रामपंचायतीची स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:02 PM

वरठी पासून ३ किलोमीटर अंतरावर २,२०० लोकवस्तीचे नेरी गाव. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तीन दशकापासून असलेली सत्ता पालटून गावाच्या विकासाची सूत्र युवा सरपंच आनंद मलेवार यांच्याकडे आली.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : लोकसहभाग व बचत गटाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान

तथागत मेश्राम।आॅनलाईन लोकमतवरठी : वरठी पासून ३ किलोमीटर अंतरावर २,२०० लोकवस्तीचे नेरी गाव. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तीन दशकापासून असलेली सत्ता पालटून गावाच्या विकासाची सूत्र युवा सरपंच आनंद मलेवार यांच्याकडे आली. राजकारणाचा अनुभव नसलेल्या सरपंचानी सहकारी उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवक निरंजना खंडाळकर यांच्या मदतीने गावात अभिनव उपक्रम राबवले.गावाची स्वच्छतेकडून समृद्धीकडे सुरु असलेली वाटचाल आहे.तलावाच्या पायथ्याशी असलेले पुरातन मंदिर हे एखाद्या पर्यटन स्थळाला लाजवेल असे देखणे व आकर्षक दिसते. गावाच्या विकासात असलेला युवक व महिलांचा सहभाग आणि सर्व सुविधायुक्त ग्राम पंचायतीची इमारत आहे. नेरी हे गाव खेड्यात मोडते. ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय. घराघरात जनावरे आणि मुख्य मार्गावर खताच्या खड्ड्याने गावात स्वागत होत असे. गावाच्या मुख्य मार्गावर व लोकवस्तीत असलेल्या खड्ड्यांमुळे गावात दुर्गंधीयुक्त व वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.सिमेंटचे रस्ते हे मातीने व कचऱ्याने सजलेले राहायचे. सरपंच आनंद मलेवार व उपसरपंच रामदास जगनाळे यांनी गावातील युवकांमध्ये जनजागृती करून मुख्य मार्गावर स्थित खताच्या खड्ड्यांचे निर्मूलन केले. विरोध पत्करून गावातील खताचे खड्डे गावाबाहेर हलवून खड्ड्याचे रूपांतर रस्त्यात करून दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली.गावाच्या चारही बाजूला मुख्य प्रवेश व्दारावर सी सी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. गावात असलेल्या केंद्रीय शाळेत डिजिटल क्लासरूम लोकवर्गणीतून तयार करण्यात आली. विध्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शालेय परिसर सी सी टीव्ही कमरेच्या नजरेत ठेवण्यात आले आहे. गावात असलेले समाज मंदिर हे सुशोभित करून नियमित होणाऱ्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाच्या करीत खुले करण्यात आले आहे. व्यायाम शाळा व वाचनालयाचे संचालन युवक स्वत: करतात. कचरा कंटेनरची व्यवस्था केली.सरपंच आनंद माळेवर यांनी आपली कसोटी पणाला लावून गावात महिला व युवकाची फौज उभी केली. महिला बचत गटाच्या माध्यमातून श्रमदान म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून सुरक्षा दलाची स्थापना करून गावात उघड्यावर फेकण्यात येणाºयांवर लक्ष ठेवण्यात येते. यासाठी जिल्हा स्तरावरून मदत घेण्यात येत आहे. सध्या स्थित २ हजारच्या लोकवस्तीत ५०० च्या वर महिला पुरुष या कामात नियमित मदत करीत आहेत. सरपंच आनंद मलेवार, उपसरपंच रामदास जगनाळे, ग्राम पंचायत सदस्य कमलेश वैद्य, अजय लांजेवार, आनंद गेडाम, लक्ष्मी पालांदूरकर, रिटा मेश्राम, निरंजना हजारे, साधना पडोळे, प्रतिमा भांडारकर व ग्रामसेवक निरंजना खंडाळकर यांची टीम स्वच्छतेकडून समृद्धीकडे उपक्रमासाठी आहेत.अभिनव स्वागत, आकर्षक इमारतनेरीच्या मुख्य चौकात रस्त्यावर ग्राम पंचायतीची इमारत आहे. ग्राम पंचायत परिसरात केलेले सौंदर्यीकरण आणि देखणी व आकर्षक आहेत इमारत सहज विचार करायला लावते. रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला सहज लक्ष वेधून घेईल असे आवार तयार करण्यात आले आहे. अभिनव स्वागत व आकर्षक इमारत हा ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांची जमेची बाजू आहे.तलावाच्या पाळीवर आकर्षक मंदिरगावाच्या शेवटच्या टोकावर एक मोठा तलाव आहे. तलावाच्या पायथ्यावर देखणे असे निसर्गरम्य असलेले वृक्षाचे डोलारा गावाच्या सौंदर्यात भर घालते. तलावाच्या खालच्या बाजूला असलेली जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा आणि मैदानात खेळणारे मुले हि निसर्गरम्य पर्यटन स्थळाची आठवण करून देतात.आकर्षक आहे.