पवनी-उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात तीन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन; पर्यटकांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 17:51 IST2021-12-12T17:45:13+5:302021-12-12T17:51:17+5:30
अभयारण्यात अगदी सकाळच्या प्रहरी ही वाघीण आपल्या बछड्यासह जंगल भ्रमण करण्याकरीता निघाली. पवनी उमरेड करांडला अभ्ययारण्यात पर्यटकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात टीपली.

पवनी-उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात तीन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन; पर्यटकांमध्ये उत्साह
भंडारा : पवनी-उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात रविवारी सकाळी पर्यटकांना तीन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन पवनीगेट जवळ झाले. यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एका पर्यटकाने याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.
अभयारण्यात अगदी सकाळच्या प्रहरी ही वाघीण आपल्या बछड्यासह जंगल भ्रमण करण्याकरीता निघाली. पवनी उमरेड करांडला अभयारण्यात पर्यटकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात टीपली. या अभयारण्यात मागील कित्येक दिवसांपासून वाघाचे दर्शन होत आहे. येथे अनेक प्राणी असून दूरदूरच्या भागातून पर्यटक खास करून वाघाचे दर्शन घेण्याकरिता पवनी येथे येत आहेत. त्यातच आज वाघीणीसह तिचे तीन छावे दिसल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
हिवाळ्यातील गुलाबी थंडीत वाघाचे दर्शन आणि जंगल सफर करण्याच्या दृष्टीने पर्यटक या अभयारण्याला भेट देत असून त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिवसेंदिवस या अभयारण्याकडे पर्यटक आकर्षिले जात आहेत हे विशेष. रविवारी सकाळी ऐनवेळी अभयारण्यात वाघीणीचे बछड्यांसह दर्शन झाल्याने, जंगल सफारीला येण्याचे उद्देश सफल झाल्याचे पर्यटकांनी सांगितले.