दोन चिमुकल्यांसह आईने घेतले विष; मुलाचा मृत्यू, माय-लेकींची प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 13:02 IST2021-12-14T12:43:21+5:302021-12-14T13:02:17+5:30
दोन चिमुकल्यांसह आईने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आई व मुलीवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन चिमुकल्यांसह आईने घेतले विष; मुलाचा मृत्यू, माय-लेकींची प्रकृती चिंताजनक
भंडारा : दोन चिमुकल्यांसह आईने विष घेतल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेत मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, आई व मुलीला नागपूर येथे हलविले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
ही हृदयद्रावक घटना भंडारा तालुक्याच्या ठाणा (पेट्रोलपंप) येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात कार्तिक ज्ञानेश्वर शहारे (१४ महीने) असे मृत बालकाचे नाव आहे. तर, महिलेचे नाव वंदना ज्ञानेश्वर शहारे व मुलीचे नाव विधी ज्ञानेश्वर शहारे (५) असे आहे. वंदना हिने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार्तिक व विधीला विष पाजून स्वत: विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या तिघांना रुग्णालयात हलवण्यात आले मात्र, कार्तिकचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, माय-लेकींना नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.