तीन आठवड्यापासून मान्सून रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:41 IST2019-07-24T00:40:33+5:302019-07-24T00:41:01+5:30
जगाचा पोशिंदा म्हणवणारा अन्नदाता मान्सूनच्या रूसव्याने संकटात सापडला आहे. जुलैच्या आरंभापासून पाऊसच नसल्याने पऱ्हे करपली आहेत. रोवणीची आस असलेला अन्नदाता संपूर्ण परिवारासह डोक्यावरून पाणी वाहतूक करीत पऱ्हे वाचविण्याकरिता एकच धडपड करीत आहे.

तीन आठवड्यापासून मान्सून रजेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : जगाचा पोशिंदा म्हणवणारा अन्नदाता मान्सूनच्या रूसव्याने संकटात सापडला आहे. जुलैच्या आरंभापासून पाऊसच नसल्याने पऱ्हे करपली आहेत. रोवणीची आस असलेला अन्नदाता संपूर्ण परिवारासह डोक्यावरून पाणी वाहतूक करीत पऱ्हे वाचविण्याकरिता एकच धडपड करीत आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात तीन-चार दिवस सतत हजेरी लावत मान्सून आल्याची वर्दी मिळाली. हवामान खात्यानेही सुतोवात देत पाऊस बरसण्याची शाश्वतीची पुष्टी केली. सिंचन क्षेत्रातील अन्नदात्याने तात्काळ ऱ्हे टाकली. कोरडवाहू मध्ये आठवडाभरानंतर पऱ्हे टाकणीस आरंभ झाला. पऱ्हे उगवणीपर्यंत तेवढा पाऊस बरसला. नंतर मात्र जो दीर्घ रजेवर गेला तो अजुनही परतला नाही. सिंचनाखालील रोवणी सुकली असून मरणासन्न झाली आहे, पऱ्हे पूर्णत: करपली असून केवळ तणस झाल्यावाणी दिसत आहे. उष्णता अधिक असल्याने अपेक्षित दाबाने वीज मिळत नाही. कित्येक मोटारपंप निकामी ठरली आहेत. खंडीत वीजेचे सुद्धा सिंचन सुविधा अडचणीत आल्या आहेत. पाऊसच नसल्याने अपेक्षित प्रमाणात वीज पुरवठा शक्य नसल्याचे वीज अभियंत्यांनी सांगितले.